सोशल मीडियावरील अफवांविरोधात व्हॉट्सअॅपने कसली कंबर

सरकारनं विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना व्हॉट्सअॅपने हे स्पष्टीकरण दिले.

Updated: Aug 6, 2018, 12:22 PM IST
सोशल मीडियावरील अफवांविरोधात व्हॉट्सअॅपने कसली कंबर title=

मुंबई : झुंडशाहीतून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी आता व्हॉट्सअॅपनंही कंबर कसलीय. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी व्हॉट्सअॅपनं स्वतःचं एक पथक तयार केलंय. खोट्या बातम्यांचे संदेश नेमके कुठे उगम पावतायत याचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचं काम या पथकाकडे देण्यात आलंय.

सरकारनं विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना व्हॉट्सअॅपने हे स्पष्टीकरण दिले. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं सोशल मीडिया चालवणाऱ्या कंपन्यांना झुंडशाहीतून होणाऱ्या मृत्यूंसंदर्भात काही प्रश्न विचारले होते. त्यात कंपन्यांनी खोट्या बातम्या पसरणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी नेमकं काय केलंय याचा तपशील विचारला होता. त्याला उत्तर देताना व्हॉट्सअपनं ही माहिती दिली.