बाजारात दाखल झालाय चार कॅमेऱ्यांचा स्मार्टफोन!

अमेरिकन मोबाईल फोन निर्माता कंपनी इनफोकसनं बुधवारी भारतात दोन नवे स्मार्टफोन दाखल केलेत. टर्बो ५ प्लस आणि स्नॅप ४ असे हे दोन स्मार्टफोन आहेत.

Updated: Sep 14, 2017, 04:52 PM IST
बाजारात दाखल झालाय चार कॅमेऱ्यांचा स्मार्टफोन! title=

नवी दिल्ली : अमेरिकन मोबाईल फोन निर्माता कंपनी इनफोकसनं बुधवारी भारतात दोन नवे स्मार्टफोन दाखल केलेत. टर्बो ५ प्लस आणि स्नॅप ४ असे हे दोन स्मार्टफोन आहेत.

इनफोकस स्नॅप ४

उल्लेखनीय म्हणजे, इनफोकस स्नॅप फोनमध्ये कंपनीनं चार कॅमेरे दिलेत. फोटोग्राफी स्पेशल अशा या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजुला १३ मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सल कॅमेराचं सेटअप आहे. तर पुढच्या बाजुलाही ८ मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सलच्या दोन कॅमेऱ्यांचं सेटअप दिलंय. 

बॅक कॅमेऱ्यासोबतच ड्युएल एलईडी फ्लॅशही आहे. हा एक ड्युएल सिम स्मार्टफोन आहे जो अँन्ड्रॉईड ७.० नूगावर चालतो. याच्या मॅटेलिक बॉडीत ४ जीबी रॅम आणि ऑक्टाकोर मीडियाटेक प्रोसेसर आहे. यात ५.२ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले देण्यात आलाय. ३००० mAH ची बॅटरी आणि होम बटनवर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलाय.

टर्बो ५ प्लस

तर बॅटरी लाईफवर फोकस करत इनफोकसनं टर्बो ५ प्लस लॉन्च करण्यात आलाय. यामध्ये ४९५० mAH बॅटरी देण्यात आलीय. टर्बो ५ प्रमाणे यातही मागच्या बाजुला १३ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर पुढच्या बाजुला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 

हे दोन्ही फोन फोरजी एलटीई नेटवर्कला सपोर्ट करतात. टर्बो ५ प्लसची किंमत ८,९९९ रुपये आणि स्नॅप ४ ची किंमत ११,९९९ रुपये निर्धारित करण्यात आलीय. लवकरच हे दोन्ही फोन अमेझॉनवर दाखल होतील.