JVCचा ब्लुटूथ स्पीकर भारतात लाँच, पाहा किती आहे किंमत?

फ्लिपकार्ट आणि क्रोमावर हा स्पीकर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Updated: Jul 3, 2018, 10:29 AM IST
JVCचा ब्लुटूथ स्पीकर भारतात लाँच, पाहा किती आहे किंमत? title=

नवी दिल्ली: जपानची कंपनी JVCने आपला Boombox XS-XN15 पोर्टेबल स्पीकर भारतात लाँच केला. दिसायला अगदी सिलिंडर शेपसारखा असलेला हा स्पीकर वायरलेस असून, काळ्या रंगात आपणास उपलब्ध आहे. प्राप्त माहितीनुसार या स्पीकरची सध्याची किंमत ४,९०० इतकी आहे. फ्लिपकार्ट आणि क्रोमावर हा स्पीकर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

स्पीकरची खास वैशिष्ट्ये

मल्टीपल कनेक्टिव्हिटी ऑप्शनसोबत या स्पीकरला ब्लुटूथ सपोर्ट उपलब्ध आहे. याच्या साईड पॅनलला ब्लुटूथ सपोर्टशिवाय पेन ड्राईव्ह आणि एसडी कार्ड कनेक्ट करण्यासाठीही सपोर्ट देण्यात आला आहे. सोबतच साईड पॅनलमध्ये मायक्रोफोन स्लॉट, एफएम रेडिओ आणि AUX कनेक्टिव्हिटी सपोर्टही देण्यात आला आहे.

५ ते ८ तासांचा बॅटरी बॅकअप

स्पीकरला 1000mAhची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही बॅटरी ५ ते ८ तास इतक्या कालावधीपर्यंत काम करू शकते. याशीवाय 2x2W +5W RMS आऊटपूटवाला हा स्पीकर इस्टंट बेस आणि उत्कृष्ट आवाज देऊ शकेल असाही दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या स्पीकरमध्ये बिल्ट-इन इक्वलाइज़रही आहे. साईड पॅनलमध्ये bass आणि trebleवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगवेगळे साऊंड कंट्रोल दिले आहेत.

१० दिवसांची रिप्लेसमेंट गॅरेंटी

JVC Boombox XS – XN15 सोबत एक स्ट्रीपही मिळेल. ज्यामुळे तुम्ही हा स्पीकर खांद्याला किंवा गळ्यातही अडकवू शकता. स्पीकरचा डायमेंशन 291x169x182mm आहे. याशिवाय कंपनीने स्पीकरसोबत १० दिवसांची रिप्लेसमेंट गॅरेंटी आणि एक वर्षाची वॉरंटीही दिली आहे