Jio युजर्सला मिळतात हे १२ फायदे, तुम्हाला माहिती आहे का?

रिलायन्स जिओने ५ सप्टेंबर २०१६ रोजी पहिल्यांदाच आपल्या सेवेची घोषणा केली 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 13, 2017, 12:41 PM IST
Jio युजर्सला मिळतात हे १२ फायदे, तुम्हाला माहिती आहे का? title=
File Photo

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने ५ सप्टेंबर २०१६ रोजी पहिल्यांदाच आपल्या सेवेची घोषणा केली. जिओने सर्वात पहिल्या युजर्सला वेलकम ऑफर दिली. त्यानंतर हॅप्पी न्यू इयर ऑफरच्या माध्यमातून युजर्सला अधिक फायदा करुन दिला.

मार्च २०१७मध्ये जिओने आपल्या ग्राहकांना प्राइम मेंबरशिप दिली. मग, इतरही कंपन्यांनी आपल्या विविध ऑफर्स लॉन्च केल्या. यानंतर जिओने समर सरप्राइज ऑफर लॉन्च केली.

मग, जिओने आपली 'धन धना धन ऑफर' लॉन्च करत सर्वांनाच धक्का दिला. रिलायन्स जिओ सारखा फायदा इतर कुठल्याही कंपन्यांनी ग्राहकांना दिला नाही. रिलायन्स जिओचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. पाहूयात रिलायन्स जिओकडून मिळणारे फायदे...

फ्री अनलिमिटेड कॉल्स

रिलायन्स जिओची मार्केटमध्ये एन्ट्री झाली तेव्हापासून आतापर्यंत जिओ युजर्सला अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळत आहे. ही सुविधा प्रत्येक युजर्ससाठी फ्री आहे. प्रीपेड असो किंवा पोस्टपेड सर्व ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्सची सुविधा देण्यात आली आहे.

स्वस्त इंटरनेट

रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यानंतर युजर्सला सर्वात मोठं गिफ्ट मिळालं ते म्हणजे फ्री आणि जास्त इंटरनेट डेटा. जिओ लॉन्च होण्यापूर्वी युजर्सला प्रत्येक महिन्याला शेकडो रुपये द्यावे लागत होते. ग्राहक महागडे प्लान आणि कमी इंटरनेट डेटा यामुळे त्रस्त होते. मात्र, जिओने ही सुविधा युजर्सला एकदम फ्रीमध्ये उपलब्ध करुन दिली.

फ्री न्यूज

रिलायन्स जिओच्या माय जिओ अॅपमध्ये तुम्हाला न्यूज मिळतात. या अॅपला डाऊनलोड करुन तुम्ही जगातील प्रत्येक बातमीवर नजर ठेवू शकतात. क्षणा-क्षणाचे अपडेट्स तुम्हाला या अॅपच्या माध्यमातून मिळतात.

फ्री म्युझिक

जिओ सिनेमाप्रमाणे गाणी ऐकण्यासाठी जिओ म्युझिक अॅप फ्री आहे. यामध्ये युजर्स आपले आवडते आणि लेटेस्ट गाणी ऐकू शकतात. हे अॅप माय जिओ अॅपमध्ये जाऊन डाऊनलोड करु शकता येतं.

जिओ टीव्ही

जिओ टीव्हीमध्ये तुम्हाला प्रत्येक चॅनल पहायला मिळेल. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शुल्क द्यावं लागणार नाही. खास बाब म्हणजे तुम्ही प्रोग्रामची वेळ निघून गेल्यानंतरही मागे जाऊन तो प्रोग्राम पाहू शकता. यासोबतच लाइव्ह स्ट्रिमिंगचीही सुविधा आहे.

फ्री रोमिंग

जिओने आपल्या ग्राहकांसाठी फ्री रोमिंगचं एक गिफ्ट दिलं आहे. आपला जिओ नंबर तुम्ही भारतातील कुठल्याही परिसरात वापरु शकता. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही.

जिओ सिक्युरिटी

रिलायन्स जिओच्या माय जिओ अॅपमध्ये जिओ सिक्युरिटी अॅपचाही समावेश आहे. या अॅपमुळे फोन सुरक्षित राहतो. कंपनीचा दावा आहे की, हा अॅप इंस्टॉल केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये अँन्टीव्हायरस इंस्टॉल करण्याची गरज पडणार नाही.

फ्री मेसेज

अनलिमिटेड कॉलिंगप्रमाणेच जिओची एसएमएस सेवाही फ्री आहे. पूर्वी यामध्ये अनलिमिटेड एसएमएस सुविधा होती. मात्र, आता यात घट करुन १०० मेसेज प्रतिदिन करण्यात आलं आहे. 

स्वस्त ४जी स्मार्टफोन

लाइफ ब्रँडचे सर्व स्मार्टफोन्स ४जी VoLTE सपोर्टसोबत येतात. हे सर्व बजेट स्मार्टफोन्स आहेत म्हणजेच खूपच कमी रुपयांत तुम्हाला ४जी VoLTE फीचरची सुविधा मिळते. लाइफ ब्रँडचा सर्वात स्वस्त ४जी फोन ३००० रुपयांत उपलब्ध आहे.

VoLTE ची सुविधा

वॉईस ओव्हर लॉन्ग-टर्म इवॉल्यूशन ही सुविधा तुम्हाला हायस्पीड वायरलेस कम्युनिकेशनचा लाभ देते. यामुळे संवाद खूपच चांगल्याप्रकारे होतो. वॉईस कॉलिटीही चांगली होते. 

जिओफाई (JioFi)

रिलायन्स जिओने आपली जिओफाई (JioFi) डिव्हाईस लॉन्च केला आहे. याच्या माध्यमातून युजर्स ४जी फोन नसलेले ग्राहक या डिव्हाईसमध्ये जिओ सिमचा वापर करुन जिओ इंटरनेटचा वापर करु शकतात.