कावासाकी निनजा ६५० ब्लॅक भारतात लॉन्च

कावासाकीनं त्यांची निनजा ६५० ही बाईक भारतात लॉन्च केली आहे. 

Updated: Jul 6, 2018, 11:01 PM IST
कावासाकी निनजा ६५० ब्लॅक भारतात लॉन्च title=

मुंबई : कावासाकीनं त्यांची निनजा ६५० ही बाईक भारतात लॉन्च केली आहे. ५.५० लाख रुपये (दिल्ली एक्सशोरूम) एवढी या बाईकची किंमत आहे. कावासाकी निनजाचं हे २०१९ सालचं मॉडेल आङे. याआधी मागच्यावर्षी निनजा केआरटी एडिशनमध्ये निळ्या रंगात आली होती. यावर्षी मात्र काळ्या रंगात निनजा लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकला ६५० सीसीचं इंजिन आहे. मागच्या वर्षी आलेली निनजा केआरटी एडिशन ५.६९ लाख रुपयांना होती. एबीएस, इकोनॉमिकल रायडिंग इंडिकेटर, लो सीट हाईट, अपराईट रायडिंग पोजिशन, असिस्ट आणि स्लिपर क्लच हे फिचर्स कावासाकी निनजाच्या या मॉडेलमध्ये आहेत. या बाईकला पॅरलल ट्विन इंजिन डीओएचसीसोबत आहे.