कोडॅकने लॉन्च केला ५५ इंचांचा स्मार्ट टिव्ही

जबरदस्त कॅमेऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोडॅकने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्ट एलईडी टिव्ही लॉन्च केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 12, 2017, 09:37 PM IST
कोडॅकने लॉन्च केला ५५ इंचांचा स्मार्ट टिव्ही  title=

नवी दिल्ली : जबरदस्त कॅमेऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोडॅकने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्ट एलईडी टिव्ही लॉन्च केला आहे.

कोडॅक ब्रँडचं लायसन्स असलेली कंपनी सुपर प्लास्ट्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (एसपीपीएल)ने ५५ इंचाचा ४K UHD स्मार्ट टिव्ही भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. कंपनीने या टिव्हीची किंमत ४३,९९० रुपये ठेवली आहे.

या स्मार्ट टिव्हीची विक्री करण्यासाठी कोडॅक कंपनीने ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टसोबत करार काल आहे. कोडॅक टिव्हीचीची विक्री फ्लिपकार्टवर या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु होणार आहे.

या टिव्हीच्या स्पेसिफिकेशनचा विचार केला तर याची साईज ५५ इंचाची आहे. हा एक ४K UHD स्क्रिन असलेला टिव्ही आहे. या टिव्हीचं रिझॉल्युशन ३८४० X २१६० पिक्सल आहे. या स्मार्ट टिव्हीत A डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टिव्ही दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने बनवला आहे. यात १.४ GHz ड्युअल-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.

तसेच १जीबी रॅम आणि ८जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. या टिव्हीसोबत एक खास रिमोट देण्यात येणार आहे. ज्यामध्ये युट्यूब, नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारसाठी वेगळं बटन देण्यात आलं आहे. या बटनाच्या माधय्मातून तुम्ही डायरेक्ट अॅक्सेस करु शकतो.

कोडॅक कंपनीचा हा स्मार्ट टिव्ही अँड्रॉईड ४.४ किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. तसेच यामध्ये Aptoide TV अॅप देण्यात आलेलं आहे. याच्या माध्यमातुन युजर्स आपलं आवडतं अॅप डाऊनलोड करु शकतात.