स्कॉर्पिओचं नवं मॉ़डेल बाजारात, पाहा किंमत आणि फिचर्स

महिंद्र समुहाची कंपनी महिंद्र अॅण्ड महिंद्रनं टाटा हॅरियरच्या २०१९ सालच्या लॉन्चिंग आधीच स्कॉर्पिओचं नवीन मॉडेल एस-९ बाजारात आणलं आहे.

Updated: Nov 17, 2018, 11:11 PM IST
स्कॉर्पिओचं नवं मॉ़डेल बाजारात, पाहा किंमत आणि फिचर्स  title=

मुंबई : महिंद्र समुहाची कंपनी महिंद्र अॅण्ड महिंद्रनं टाटा हॅरियरच्या २०१९ सालच्या लॉन्चिंग आधीच स्कॉर्पिओचं नवीन मॉडेल एस-९ बाजारात आणलं आहे. या गाडीची दिल्ली एक्स शोरूमची किंमत १३.९९ लाख रुपये आहे. या मॉडेलला कंपनीनं मागच्या वर्षी लॉन्च केलं होतं. या गाडीमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीमसह अनेक आकर्षक फिचर्स देण्यात आली आहेत.

महिंद्रा अल्टूरस जी-४ सगळ्यात लक्सरीयस हाय-एंड एसयूव्ही

महिंद्रानं त्यांची हाय-एंड एसयूव्ही अल्टूरस जी-४च्या हाय-एंड फिचर्सचाही खुलासा केला आहे. यामध्ये ८-वे पॉवर्ड ड्रायवर सीट विथ मेमरी प्रोफाईल, ड्युअल झोन एफएटीसी, ९ एअरबॅग्स, ३ डी ३६० डिग्री अराऊंड व्ह्यू कॅमेरा, वेंटिलाइज्ड सीट्स, अॅक्टीव्ह रोल ओव्हर प्रोटेक्शन ही प्रमुख फिचर्स आहेत. ही एसयूव्ही ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या एसयूव्हींशी स्पर्धा करेल.

महिंद्र मराझोची किंमत ४० हजार रुपयांनी वाढली

महिंद्रनं त्यांच्या मराझो गाडीची किंमत ३० हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. ही किंमत १ जानेवारी २०१९पासून लागू होईल. लॉन्चिंगवेळी ठेवण्यात आलेली किंमत ही सुरुवातीची होती. त्यामुळे ४ महिन्यांनंतर आम्ही ही किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं कंपनीनं सांगितलं. 

मराझोलाचं डिझाईन महिंद्र डिझाईन स्टुडिओ आणि इटलीची प्रसिद्ध डिझाईन हाऊस पिनइनफारनिया यांनी मिळून बनवलं आहे. या गाडीचं अभियांत्रिकी काम महिंद्र नॉर्थ अमेरिका टेक्निकल सेंटर आणि चेन्नईच्या महिंद्र रिसर्च व्हॅलीनं केलं आहे.