नव्या स्कॉर्पिओची झलक तुम्ही पाहिलीत का? नव्या स्कॉर्पिओत हे असतील वैशिष्टये

महिंद्राच्या नव्या स्कॉर्पिओची झलक पाहण्यासाठी ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती अखेर ही उत्सुकता लक्षात घेवून महिंद्राने टीझर लॉन्च केला आहे. 

Updated: May 12, 2022, 06:16 PM IST
नव्या स्कॉर्पिओची झलक तुम्ही पाहिलीत का? नव्या स्कॉर्पिओत हे असतील वैशिष्टये title=

महिंद्राच्या नव्या स्कॉर्पिओची झलक पाहण्यासाठी ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर महिंद्राने नव्या स्कॉर्पिओची झलक ग्राहकांना दाखवली आहे. 2022 महिंद्रा स्कॉर्पिओचा एक व्हिडीओ कंपनीने आपल्या युट्युब चॅनेलवरुन प्रसारित केला आहे. या एसयूव्हीच्या पहिल्या टीझरमध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे. महिंद्राच्या या नव्या स्कॉर्पिओला एसयूव्हीचा 'बिग डॅडी' म्हणून ओळख या व्हिडीओमधून देण्यात आले. येत्या काही दिवसांत ती भारतात लॉन्च होणार आहे. SUV च्या 20 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कंपनी जून 2022 पर्यंत  ही नवीन स्कॉर्पिओ लॉन्च करू शकते. ही नवी स्कॉर्पिओ 15 ऑगस्ट पर्यंत बाजारात व्रिकीसाठी उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. टीझरमध्ये कंपनीने स्पष्ट केले आहे की नवीन स्कॉर्पिओ ही डी-सेगमेंट एसयूव्ही असेल. 

स्कॉर्पिओ स्टिंग किंवा महिंद्रा स्कॉर्पिओ!
अलीकडे, स्कॉर्पिओमध्ये एक नवीन वैशिष्ट्य जोडले ते म्हणजे टर्न इंडिकेटर आहे. जे बहुतेक वेळा महागड्या कारमध्ये दिसते. एका मीडिया रिपोर्टनुसार, महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ स्टिंग किंवा महिंद्रा स्कॉर्पिओ या नावाने बाजारात आणली जाऊ शकते. महिंद्राने नवीन स्कॉर्पिओसह विद्यमान मॉडेलची विक्री सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ नवीन स्कॉर्पिओ सध्याच्या मॉडेलची जागा घेणार नाही.

केबिनमधील वैशिष्ट्ये 
नवीन 2022 SUV च्या केबिनमध्ये, कंपनीने टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ड्युअल टोन ब्लॅक आणि ब्राऊन इंटीरियर थीम, मोठ्या आकाराची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्लायमेट कंट्रोलर तसेच नवीन थ्री-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, फ्रंट डोअर स्पीकर, नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आणि अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

नवीन स्कॉर्पिओची सुरक्षा
2022 महिंद्रा स्कॉर्पिओला मिळणार्‍या इतर वैशिष्ट्यांपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अलीकडेच लाँच झालेल्या Mahindra XUV700 मध्ये पाहिल्याप्रमाणे प्रगत ड्रायव्हर सहाय्यता प्रणाली असू शकते. कारच्या टॉप मॉडेलमध्येही हे फिचर असण्याची शक्यता आहे. येथे ग्राहकांना 10-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, सर्वत्र एलईडी लाईट्स, 6 एअरबॅग्ज आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान यांसारखी हाय-टेक वैशिष्ट्ये देखील मिळू शकतात. कंपनी या कारसोबत 360-डिग्री कॅमेरा देखील देणार आहे, ज्यामुळे नवीन स्कॉर्पिओ सुरक्षिततेच्या दृष्टीने एक उत्तम SUV बनणार आहे.

इंजिन आणि पॉवर 
नवीन जनरेशन स्कॉर्पिओ 155 bhp पॉवर आणि 360 Nm पीक टॉर्क बनवणारे 2.0-लीटर mHawk टर्बो पेट्रोल आणि 150 bhp पॉवर आणि 300 Nm पीक टॉर्क बनवणारे 2.0-लिटर 4-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह आढळू शकते. कंपनी या दोन्ही इंजिन पर्यायांना 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देऊ शकते.