IT Sector : कोणत्याही माणसाची उंची त्याची पर्सनालिटी दर्शवते. अनेकदा कमी उंचीमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. उंची वाढवण्यासाठी आणि उंच दिसण्यासाठी लोक अनेक उपाययोजना करतात. महिला उंच दिसण्यासाठी हिल्सचा देखील वापर करतात. अशातच आता उंची वाढवण्यासाठी IT Sector मध्ये विचित्र ट्रेंड पहायला मिळत आहे. (New trend in IT Sector artificially increase the height at the cost of lakhs)
नुकतंच लास वेगासच्या एका सर्जनने धक्कादायक खुलासा केला. जगप्रसिद्ध कंपनी गुगल, माइक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन आणि मेटा सारख्या कंपनीत काम करणारे आयटी कर्मचारी फक्त तीन इंच उंची वाढवण्यासाठी लाखो रुपये खर्च करताना (Artificially increase the height) दिसत आहेत. उंचीच्या बाबतीत कधी खुलेआम चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे सध्या आयटी सेक्टरमधील ट्रेंड सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
अमेरिकन इंटरनॅशनल मंथली मेन्स मॅगझीन GQ मध्ये या संदर्भातील रिपोर्ट पब्लिश करण्यात आलाय. काही वर्षांपूर्वी लिम्बप्लास्टएक्स संस्थेचे संस्थापक केविन देबीपार्शद यांनी यावर सखोल अभ्यास करून रिपोर्ट दिला होता. या रिपोर्टनुसार, गुगल (Google), माइक्रोसॉफ्ट (Microsoft), अॅमेझॉन (Amazon) आणि मेटाचे (Meta) कर्मचारी उंच दिसण्यासाठी तब्बल 75 हजार डॉलर म्हणजेच 59,76,727 रुपये खर्च करत आहेत.
व्यक्तीची उंची त्याच्या पायाच्या लांबीवर अवलंबून असते, असं सांगितलं जातं. आर्टिफिशियल पद्धतीने उंची वाढवण्याच्या प्रोसेसमध्ये , व्यक्तीच्या मांडीच्या हाडात धातूचे नखे घातले जातात, ज्याला मांडीचे हाड किंवा फेमर असेही म्हणतात. एकंदरीत तीन महिन्यांची ही प्रकिया असते. तीन महिन्याच्या काळात मेटल नट्सची उंची हळूहळू वाढवली जाते. ही संपुर्ण प्रक्रिया मॅग्नेटीक रिमोट कंट्रोलद्वारे केली जाते.
सर्जरीनंतर ठीक होण्यासाठी काहीसा वेळ देखील लागतो. कोरोनानंतर अशा प्रकारची सर्जरी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कमी उंची असल्याने आत्मविश्वास कमी होतो. त्याचसोबत पर्सनालिटीवर देखील परिणाम झाल्याचं अनेकांना वाटतं. त्यामुळे उंची वाढवण्यासाठी हे कर्मचारी प्रयत्नशील आहेत.