भारतीय सीईओला वर्षाला ८५७ कोटी रूपयांचं वार्षिक पॅकेज

जगात टेक्नॉलॉजीचा दबदबा जेवढा वाढतोय, तेवढाच बिझनेस देखील आणि हा बिझनेस देणाऱ्यांना काहीच कमी पडत नाही.

Updated: Jun 5, 2018, 11:18 PM IST
भारतीय सीईओला वर्षाला ८५७ कोटी रूपयांचं वार्षिक पॅकेज title=

मुंबई : जगात टेक्नॉलॉजीचा दबदबा जेवढा वाढतोय, तेवढाच बिझनेस देखील आणि हा बिझनेस देणाऱ्यांना काहीच कमी पडत नाही. टेक्नॉलॉजीच्या दुनियेत भारताचे निकेश अरोडा हे सर्वाधिक पगार घेणारे सीईओ झाले आहेत. या आधी निकेश अरोडा यांनी सॉफ्ट बँक आणि गूगलसोबत काम केलं आहे. आता ते पाला अल्टो नेटवर्कचे नवे सीईओ आहेत. अरोडा यांचा वार्षिक पगार रूपये १२.८ कोटी डॉलर असणार आहे. भारतीय चलनात हा पगार ८५७ कोटी रूपये असणार आहे. अरोडा यांनी सॉफ्ट बँक आणि गुगलसोबत काम केलं आहे.

पगार आणि बोनस देखील

निकेश यांना जेवढा वार्षिक पगार मिळणार आहे, तेवढीच त्यांचा वार्षिक बोनस देखील असणार आहे, सोबत त्यांना २६८ कोटी रूपयांचे शेअर्स मिळतील, मात्र ते शेअर्स त्यांना ७ वर्ष विकता  येणार नाहीत.जर निकेश, पालो अल्टोच्या शेअर्सची किंमत ७ वर्षात ३०० टक्के वाढवण्यात ते यशस्वी झाले, तर त्यांना ४४२ कोटी रूपये आणखी मिळतील.

अनेक जणांना आश्चर्याचा धक्का

निकेश यांना एवढ्या पगारावर घेण्याच्या निर्णयाने अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. क्रेडिट स्विसचे चिकित्सक ब्रॅड जेलनिक यातील एक आहेत, त्यांना फायनॅन्सिएल टाईम्सशी बोलताना म्हटलं आहे की, सायबर सिक्युरिटीचा त्यांना अनुभव नाही. पण दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की, निकेश यांच्याकडे क्लाऊड आणि डेटा डीलिंगचा फार मोठा अनुभव आहे. सध्या सायबर सिक्युरीटी डेटा अॅनलिसिसमध्ये वाईट गुंतलेली आहे.

अॅपलचे सीईओ टीम कुक यांच्यापेक्षा जास्त पगार

निकेश यांच्याआधी अॅपलचे सीईओ टीम कुक टेक्नॉलॉजीच्या दुनियेत सर्वात जास्त पगार घेणार सीईओ होते, त्यांचं वार्षिक पगार ११९ मिलियन डॉलर आहे. निकेश यांनी २०१९ मध्ये जेव्हा गुगलला राम राम केला. तेव्हा त्याच्याकडे ५० मिलियन डॉलरची वार्षिक पगाराची नोकरी होती. यानंतर निकेश यांनी सॉफ्ट बँक ज्वाईन केली होती, त्यांनी ४८३ मिलियन डॉलरचे शेअर खरेदी केले. निकेश येथे जून २०१६ पर्यंत नोकरी करत होते.

अनेक कंपन्यांकडून नोकरी देण्यास नकार 

बिझनेस स्टॅडर्डला दिलेल्या मुलाखतीत, निकेश यांनी म्हटलं आहे की, त्यांना अनेक कंपन्यांनी नोकरी देण्यास नकार दिला होता. अमेरिकेला जाताना ते घरातून ३ हजार डॉलर घेऊन निघाले होते. या पैशांवरच त्यांना दिवस काढावे लागले होते. निकेश यांना भारत आणि इंडोनेशियात इंटरनेटमध्ये गुंतवणूक केल्याचं श्रेय दिलं जातं. निकेश यांच्या या ज्ञानाच्या आधारावरच त्यांना सॉफ्ट बँकच्या बोर्डावर देखील सामावून घेण्यात आलं.

करिअरमध्ये सर्वात मोठी उंची गूगलची नोकरी

निकेश यांच्या करिअरमध्ये सर्वात मोठी उंची होती ती म्हणजे गूगलची नोकरी, निकेश २००४ आणि २००७ मध्ये गूगलच्या युरोप ऑपरेशनचे प्रमुख होते. निकेश २०११ मध्ये गूगलचे चीफ बिझनेस ऑफिसर झाले, यानंतर गूगलमधून सर्वात जास्त पगार घेणाऱ्यांच्या यादीत निकेश जावून बसले. यानंतर २०१४ मध्ये ते सॉफ्ट बँकेत आले, त्याच्याकडे इंटरनेट गुंतवणूक प्रमुखाची जबाबदारी होती.

निकेश अरोडा यांची माहिती

निकेश अरोडा यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९६८ रोजी उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे झाला. ते ५० वर्षांचे आहेत. निकेश यांचे वडील इंडियन एअरफोर्समध्ये ऑफिसर होते. निकेश यांनी त्यांचं शिक्षण दिल्लीतील एअरफोर्स स्कूलमधूनच केलं होतं.यानंतर निकेश यांनी १९८९ मध्ये बीएचयू आयटीमधून इलेक्ट्रॉनिक इंजीनिअरिंग पूर्ण केलं. ग्रॅज्युएशननंतर विप्रोमध्ये नोकरी सुरू केली, पण ती नोकरी त्यांनी लवकरच सोडली. नोकरी सोडल्यानंतर पुढील शिक्षणासाठी निकेश अमेरिकेला निघून गेले. निकेश यांनी बोस्टन नॉर्थइस्टर्न युनिवर्सिटीत एमबीए केलं.

१९९२ मध्ये निकेश यांनी फिडेलिटी इन्वेस्टमेंटमध्ये अॅनलिस्टची नोकरी केली. नोकरी करत असताना,  बोस्टन कॉलेजमध्ये फ़ायनॅशियल प्रोग्रामचं शिक्षण घेतलं, आणि रात्रीचा क्लास करून हे शिक्षण घेतलं.निकेशच्या अथक मेहनतीनंतर, निकेश क्लासमध्ये टॉपला आले, यासोबत १९९५ मध्ये निकेश यांनी चार्टर्ड फ़ायनॅंशिअल एनलिस्टचं शिक्षण पूर्ण केलं. फिडेलिटी इन्वेस्टमेंटमध्ये काम करताना त्यांना, फिडेलिटी टेक्नोलॉज़ीचे फायनान्स उप-प्रमुख बनवण्यात आलं.

फिडेलिटी नंतर निकेश यांच्या करिअरचा पुढचा टप्पा पटनम इन्वेस्टमेंट ठरला, या ठिकाणी ते जास्त दिवस थांबले नाहीत. पटनमनंतर निकेश डॉयचे टेलिकॉमला आले. सॉफ़्ट बँकेत असताना, त्यांनी भारताच्या ई-कॉमर्स सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचं श्रेय त्यांना दिलं गेलं.

निकेश  यांनी २०१५ साली ग्लोबल इंडियनमध्ये सर्वात चांगलं काम केल्याने, ईटी कॉर्पोरेट सन्मानाने गौरवण्यात आले. निकेश यांचं पहिलं लग्न किरणसोबत झालं होतं, त्यांना एक मुलगी आहे. किरणशी घटस्फोटानंतर त्यांनी आयशा थापर यांच्याशी २०१४ मध्ये लग्न केलं.