तुमच्या पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या होणार इलेक्ट्रिकमध्ये पोर्ट, कसं ते जाणून घ्या

सरकारने ज्या गाड्यांची नोंदणी रद्द केली आहे, आता त्या गाड्या पुन्हा रस्त्यावरती उतरवण्यासाठी सरकार ही नवीन योजना घेऊन येत आहे. 

Updated: Feb 16, 2022, 05:40 PM IST
तुमच्या पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या होणार इलेक्ट्रिकमध्ये पोर्ट, कसं ते जाणून घ्या title=

मुंबई : दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन रूपांतरण धोरण लागू केले जात आहे. या अंतर्गत पेट्रोल आणि डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करण्याची सरकारची योजना आहे. खरेतर काही स्टार्टअप्सनी या दिशेने पुढाकार घेतला. त्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ते लोकांना दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल कारला इलेक्ट्रिक कारमध्ये बदलण्याचा पर्याय देणार आहेत. याचा सर्वात मोठा फायदा अशा लोकांना होईल ज्यांच्याकडे 10 वर्षे जुनी डिझेल कार किंवा 15 वर्षे जुनी पेट्रोल कार आहे. कारण यामुळे त्यांची कार सरकारच्या नियमांनुसार स्क्रॅपमध्ये जाणार नाही.

कार इलेक्ट्रिकमध्ये बदलल्या जाणार

सरकारने ज्या गाड्यांची नोंदणी रद्द केली आहे, आता त्या गाड्या पुन्हा रस्त्यावरती उतरवण्यासाठी सरकार ही नवीन योजना घेऊन येत आहे. ज्यामुळे दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने पेट्रोल-डिझेल वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करणाऱ्या केंद्रांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

परंतु हे लक्षात घ्या की, जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांमध्ये इलेक्ट्रिक किट बसवण्याचे काम केवळ सरकारने मान्यता केलेल्या केंद्रांवर केले जाईल.

पेट्रोल-डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करण्यासाठी, 10 इलेक्ट्रिक किट उत्पादकांना पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच एका कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे 4 लाख रुपये खर्च येईल.

आतापर्यंत लोकांकडे जुन्या गाड्या इतर राज्यात विकण्याचा किंवा भंगारात काढण्याचा पर्याय होता. परंतु आता लोकांना आणखी एक पर्याय मिळाल्यामुळे ही एक चांगली डील आहे, असं म्हणायला काहीही हरकत नाही.

कारला इलेक्ट्रिक कारममध्ये रूपांतरित करण्याचे नियम
कारला इलेक्ट्रिक किटमध्ये रूपांतरित करण्यासाठी, सरकारने काही नियम देखील ठरवले आहेत, ज्यानुसार इंस्टॉलरला उत्पादक किंवा पुरवठादाराकडून इलेक्ट्रिक किट खरेदी करावी लागेल. इंस्टॉलरची जबाबदारी फक्त कारमध्ये प्रमाणित किट बसवण्यापुरती मर्यादित असेल.

यासोबतच वाहनात इलेक्ट्रिक किट बसवता येईल की नाही हे ठरवणेही इंस्टॉलरचे काम असेल? ज्या वाहनांमध्ये हे किट बसवले जाईल, त्यांची वर्षातून एकदा फिटनेस चाचणी करणे आवश्यक आहे.