पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी

सरकारी बँकेत नोकरी  (Government bank) करायची असेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.

Updated: Dec 31, 2019, 09:03 AM IST
पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी title=

मुंबई : Punjab National Bank Recruitment 2019: जर तुम्हाला सरकारी बँकेत नोकरी  (Government bank) करायची असेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab national bank) मध्ये अनेक पदं भरायची आहेत, यात अर्ज (Sarkari naukri) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2020 आहे. या जागेसाठी अर्ज करताना तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल.

पदांची संख्या

एकूण १२ जागा भरल्या जाणार आहेत.

यात 5 पद जनरलसाठी आहेत, 3 पद मागास वर्गासाठी, 02 पद अनुसूचित जातीसाठी, 01 पद अनुसूचित जाती जमातीसाठी, तर एक पद आर्थिक मागास वर्गासाठी असणार आहे.

तुम्हाला वरील जागेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही तो २७ डिसेंबर २०१९ डाऊनलोड पासून करू शकतात. या जागांसाठी उमेदवार आपला फॉर्म आणि रोख व्हाऊचर १० जानेवारी २०२० पर्यंत डाऊनलोड करू शकतील. तर यानंतर अर्ज करण्याची शेवटची मुदत ही १३ जानेवारी २०२० आहे. या जागा मॅनेजर आणि सुरक्षा पदासाठीही आहेत.

यासाठी ३१ हजार ७०५ ते ४५ हजार ९५० पर्यंत पगार दिला जाणार आहे. योग्य उमेदवाराजवळ ग्रॅज्युएशनसह डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच ग्रॅज्युएशन मान्यताप्राप्त विद्यापीठातून केलेलं असलं पाहिजे.

अर्जदाराचं वय कमीत कमी २१ वर्ष तर जास्तच जास्त ३५ वर्षापर्यंत असलं पाहिजे. अर्जदाराचं वय 01-07-2019 या तारखेनुसार ग्राह्य धरलं जाणार आहे.

उमेदवाराला अर्जाची फी म्हणून ३०० रूपये शुल्क असेल. तसेच एससी आणि एसटी उमेदवारांना कोणतीही अर्ज शुल्क नसेल, फक्त ५० रूपये सूचना शुल्क असेल. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावर होईल.