दहावी पास मुलांना NABARD मध्ये नोकरीची संधी

NABARD सोबत नोकरी करण्याची एक चांगली संधी आहे. NABARD मध्ये ग्रुपसी साठी काही खाली पदं भरायची आहेत.

Updated: Dec 27, 2019, 09:15 AM IST
दहावी पास मुलांना NABARD मध्ये नोकरीची संधी title=

मुंबई : NABARD सोबत नोकरी करण्याची एक चांगली संधी आहे. NABARD मध्ये ग्रुपसी साठी काही खाली पदं भरायची आहेत. ऑफिस अटेंडेंटच्या या जागा आहेत. तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर शेवटची तारीख 12 जानेवारी 2020 आहे. या विभागाकड़ून एकूण 73 जागा भरल्या जाणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रॅज्युएट तसेच त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या लोकांनी यासाठी अर्ज करू नका, तो बाद होईल.

काम काय?
ग्रुप 'सी' के ऑफिस अटेंडेंट

एकूण 73 जागा भरणार असल्याची नाबार्डची माहिती 

योग्यता
यासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकता. जे दहावी पास झालेले आहेत, असे सर्व उमेदवार यासाठी पात्र आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रॅज्युएट तसेच त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या लोकांनी यासाठी अर्ज करू नका, तो बाद होईल.

वयोमर्यादा
अर्जदाराचं वय कमीत कमी 18 वर्ष असलं पाहिजे, तसेच 1 डिसेंबर 2019 पर्यंत उमेदवाराचं वय 30 वर्षाच्या आत असलं पाहिजे.

कशी निवड होईल

या जागेसाठी निवड प्रक्रिया पहिल्या दोन टप्प्यात होईल. पहिल्यांदा टेस्ट होईल, त्यानंतर तुमच्या भाषेची चाचणी होईल. या सर्व परीक्षा ऑनलाईन होतील. सर्वात पहिली चाचणी ही 120 गुणांची असेल. यात रिजनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, अंक गणिताशी संबंधित प्रश्न असतील.

मुख्य परीक्षेत नेमकं काय असेल

जे उमेदवार प्राथमिक चाचणीत उत्तीर्ण होतील, तेच उमेदवार मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत 150 गुणांचे प्रश्न विचारले जातील. 

यात प्राथमिक स्तरावरील प्रश्न, तसेच स्वाभाविक कल, नैसर्गिक क्षमता किंवा कौशल्य, सामान्य जागृकता, इंग्रजी भाषा याच्याशी संबंधित प्रश्न असतील, यासाठी 150 गुणांच्या परीक्षेसाठी 2 तासाचा वेळ दिला जाणार आहे.

माध्यम 

या परीक्षा तुम्ही हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत देऊ शकतात.

अर्जासाठी शुल्क

उमेदवारांना या परीक्षेसाठी 450 रूपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ईएक्सएस कॅटेगरीतील उमेदवारांना परीक्षा शुल्क 50 रूपये असणार आहे.