Rakesh Jhunjhunwala यांचे हे सर्वात जास्त कमाई करणारे शेअर्स तुमच्याकडे आहेत का? यावर्षी मिळाले 400 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न

शेअर बाजारातील  Rakesh Jhunjhunwala एक प्रख्यात नाव आहे. Rakesh Jhunjhunwala विविध कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. तसेच ते ज्या कंपनीत

Updated: Mar 24, 2021, 10:52 AM IST
Rakesh Jhunjhunwala यांचे हे सर्वात जास्त कमाई करणारे शेअर्स तुमच्याकडे आहेत का? यावर्षी मिळाले 400 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न title=

मुंबई : शेअर बाजारातील  Rakesh Jhunjhunwala एक प्रख्यात नाव आहे. Rakesh Jhunjhunwala विविध कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. तसेच ते ज्या कंपनीत गुंतवणूक करतात त्यातून त्यांना मजबूत रिटर्न मिळतांना ही दिसते.  राकेश झुंझुनवाला यांनी 39 कंपन्यांच्या Stocks मध्ये गुंतवणूक केली आहे. त्यापैकी 22 Stocks त्याच्यासाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. 

झुंझुनवालांचे ते Stocks एका वर्षात दुप्पट ही झालेत. आपली मालमत्ता व्यवस्थापन कंपनी दुर्मिळ उपक्रमातील भागीदार म्हणून पोर्टफोलिओ सांभाळणारे राकेश झुनझुनवाला यांचे एकूण Stocks 1,000,000 कोटींपेक्षा जास्त आहे.  

राकेश झुंझुनवालाच्या पोर्टफोलिओमधील  मागील 1 वर्षात 4 Stocks ने 300% पेक्षा जास्त आणि 7 Stocksने 200% पेक्षा जास्त उत्पन्न दिले आहे. पोर्टफोलिओमध्ये असलेल्या झुंझुनवाला प्रकाश पाईप्सने गेल्या एका वर्षात सुमारे 400% Stocks दिला आहे. डीबी रियल्टीने 1 वर्षात 392% रिटर्न दिला आहे.  गेल्या एक वर्षात फर्स्टसोर्स सोल्यूशनने 346% रिटर्न दिला आहे.

राकेश झुंझुनवाला यांनी aptech, रॅलिस इंडिया, एनसीसी, व्हीए टेक वबाग, डेल्टा कॉर्प, टायटन, वॉकहार्ट, फोर्टिस हेल्थकेअर, ल्युपिन फार्मा, टाटा मोटर्स आणि टाटा कम्युनिकेशन्स या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.  

राकेश झुंझुनवाला गुंतवणूक कंपनी नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी (एनसीसी) च्या Stock मध्ये वर्षभरात सुमारे 342 टक्के , बिलकेअर लिमिटेडच्या Stock मध्ये 281%,  प्रकाश इंडस्ट्रीजने 238%, ऑटोलिन इंडस्ट्रीज 258%, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस 232%, अनंत राज 247%, आपटेक 210%, मंधाना रिटेल 123%, डेल्टा कॉर्प 220%, वोकार्ट 180% इतकी वाढ झाली आहे.

शेअर बाजारातील Big Bull Rakesh Jhunjhunwala प्रमाणे तुम्हालाही  Share Market मध्ये जबरदस्त कमाई करायची असेल, तर त्यासाठी तुम्हालाही Rakesh Jhunjhunwala प्रमाणे खास टीप्स वापराव्या लागतील.