ऑर्केस्ट्रा कंडक्टरच्या रूपात आता रोबोटही!

तंत्रज्ञानाच्या युगात आज अनेक आविष्कार होत आहे.

Updated: Sep 13, 2017, 12:22 PM IST
ऑर्केस्ट्रा कंडक्टरच्या रूपात आता रोबोटही!   title=

मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात आज अनेक आविष्कार होत आहे.

अनेक लहान मोठ्या कामांसाठी रोबोटची मदत घेतली जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ही किमया आता संगीतक्षेत्रातही प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे.  

रोबोट आता ऑर्केस्ट्रा कंडक्टरच्या भूमिकेतही दिसणार आहे. सूर आणि तालाचा अंदाज घेत ऑर्केस्ट्रामधील वादकांना त्याप्रकारचे संदेश देण्याचे महत्त्वाचे काम रोबोट करणार आहे. 
कोणत्या वाद्याने गाण्यामध्ये पुढाकार घ्यावा, ताल, लय किती वर किंवा खाली जाणं अपेक्षित आहे हे महत्त्वाचे काम ऑर्केस्ट्रा कंडक्टर करत असतो. अशावेळेस त्याच्या सतर्कतेचा कस लागतो. पण इतकी महत्त्वाची भूमिका आता रोबोट करणार आहे. 

इटलीची ऑपरा गायिका एंड्रिया बोकेली हा प्रयत्न करून पाहणार आहे. तिच्या एका कार्यक्रमामध्ये ऑर्केस्ट्रा कंडक्टरच्या भूमिकेत माणसाऐवजी एक रोबोट दिसणार आहे. 
ABB या स्विस कंपनीद्वारा बनवण्यात आलेला YuMi हा रोबोट  ऑर्केस्ट्रा कंडक्टर होणार आहे.  YuMi हा शब्द  Youआणि Me मधून घेण्यात आला आहे. या YuMi रोबोटच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये भारतीय संशोधक आणि डेव्हलपमेंट केंद्रानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.