50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी; Samsung ने लाँच केले दोन जबरदस्त स्मार्टफोन, किंमत फक्त...

Samsung Galaxy A55 and A35: सॅमसंगने भारतात आपले दोन नवे 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन सॅमसंगच्या Galaxy A सीरिजचा भाग आहेत. जाणून घ्या या स्मार्टफोन्सचे फिचर्स, किंमत आणि इतर माहिती.   

शिवराज यादव | Updated: Mar 14, 2024, 01:01 PM IST
50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी; Samsung ने लाँच केले दोन जबरदस्त स्मार्टफोन, किंमत फक्त... title=

Samsung Galaxy A55 and A35: जर तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. सॅमसंगने आपले दोन नवे स्मार्टफोन Galaxy A55 आणि Galaxy A35 5G लाँच केले आहेत. कंपनीने महिन्याच्या सुरुवातीलाच या दोन्ही स्मार्टफोनवरुन पडदा उचलला होता. पण कंपनीने त्यावेळी त्यांची किंमत किती असेल हे मात्र गुलदस्त्यात ठेवलं होतं. पण आता मात्र कंपनीने किंमतीचीही घोषणा केली आहे. 

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटची Super AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. तसंच A55 मध्ये कंपनीने Exynos 1480 प्रोसेसर दिला आहे. तर Galaxy A35 मध्ये Exynos 1380 प्रोसेसर मिळतो. दरम्यान सर्वसामान्य ग्राहकांसाठी सर्वात महत्वाची बाब असते ती म्हणजे किंमत. हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी किती रुपये मोजावे लागतील हे जाणून घ्या. 

Samsung ने Galaxy A35 5G ला दोन कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच केलं आहे. याच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 30 हजार 999 रुपये मोजावे लागतील. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 33 हजार 999 रुपये मोजावे लागतील. Galaxy A54 5G बद्दल बोलायचं गेल्या, कंपनीने हा स्मार्टफोन तीन कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच केला आहे. 

या स्मार्टफोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंटची किमत 42 हजार 999 रुपये आहे. स्मार्टफोनचा टॉप व्हेरियंट 12GB RAM + 256GB चा आहे. याची किंमत 45 हजार 999 रुपये आहे. 

लाँच ऑफरमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 3000 रुपयांच्या इंस्टंट डिस्काऊंटमध्ये मिळवू शकता. ही ऑफर काही मोजक्या क्रेडिट, डेबिट कार्डवर उपलब्ध आहे. 14 मार्चपासून स्मार्टफोन सेल सुरु होणार आहे. 

दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाता Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. A55 मध्ये स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Corning Gorilla Glass Victus+ वापरण्यात आलं आहे. हा  स्मार्टफोन Exynos 1480 प्रोसेसरसह येतो. यामध्ये 12GB पर्यंतचा RAM मिळतो. 

तसंच यामध्ये 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. दोन्ही स्मार्टफोन Android 14 वर आधारित  OneUI 6.1 वर काम करतात. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, IP67 रेटिंग, 5000mAh ची बॅटरी आणि 25W ची फास्ट चार्जिंग मिळते. Galaxy A55 मध्ये 50MP + 12MP + 5MP चा  ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. कंपनीने मोबाईलमध्ये 32MP चा  सेल्फी कॅमेराही दिला आहे. 

Galaxy A35 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP + 8MP + 5MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तसंच 13MP का सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Galaxy A35 5G मध्ये 8GB RAM आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजचा पर्याय मिळतो.