भारतात Whats App कडून 30 लाख अकाऊंट बॅन, यात तुमचं अकाऊंट तर नाही?

सर्वाधिक वापरात असणाऱ्या WhatsApp या मेसेजिंग आणि मल्टीमिडीया अॅपनं दुसरा कंप्लायंस अहवाल जाहीर केला आहे. कंपनीकडून 16 जुलैपासून 31 जुलै 2021 दरम्यान 30 लाखांहून अधिक भारतीय अकाऊंट बंद केली आहेत. 

Updated: Sep 1, 2021, 06:11 PM IST
भारतात Whats App कडून 30 लाख अकाऊंट बॅन, यात तुमचं अकाऊंट तर नाही?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

WhatsApp ban 30 lakh indian account : सर्वाधिक वापरात असणाऱ्या WhatsApp या मेसेजिंग आणि मल्टीमिडीया अॅपनं दुसरा कंप्लायंस अहवाल जाहीर केला आहे. कंपनीकडून 16 जुलैपासून 31 जुलै 2021 दरम्यान 30 लाखांहून अधिक भारतीय अकाऊंट बंद केली आहेत. 

नव्या आयटी नियमांचं पालन करत कंपनीनं हा अहवाल सादर केला आहे. एका निरीक्षणातून समोर आलेल्य़ा माहितीनुसार WhatsApp नं 3,027,000 हून जास्त भारतीय अकाऊंट्स बंद करण्यात आली आहेत. 

WhatsApp कडून दिलेल्या माहितीनुसार 95 टक्क्यांहून अधिक बॅन हा ऑटोमॅटेड किंवा बल्क मॅसेजिंगचा दुरुपयोग करण्यात आल्यामुळं आहे. या प्लॅटफॉर्मवर ग्लोबल अॅव्हरेज स्तरावर चुकीच्या पद्धतीनं अकाऊंटचा वापर करणारे जवळपास 8 मिलियन अकाऊंट आहेत. 

अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार कारवाईसाठीचे काही पर्याय आहेत. यामध्ये युजर्सना त्यांच्या अकाऊंटपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा काही सुविधांचा वापर करण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. 

WhatsApp च्या प्रवक्त्यांकडून आलेल्या माहितीनुसार मागील काही वर्षांमध्ये प्लॅटफॉर्मनं युजर्सना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजंस (AI), अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा साइंटिस्ट आणि एक्सपर्ट्स यांसारख्या प्रक्रियांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ज्यानंतर अकाऊंटचा चुकीच्या पद्धतीनं वापर करणाऱ्या अकाऊंट्सवर बंदी आणली गेली आहे.