सोनीने लॉन्च केला नॉईज कॅन्सलींग हेडफोन, किती आहे किंमत..

किंमत पाहून तुमच्या भूवया काहीशा उंचावतील. पण, तुम्ही जर म्युझिकचे शौकिन असाल तर, तुम्ही खरेदीचे धाडस दाखवाल...

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 25, 2017, 06:12 PM IST
सोनीने लॉन्च केला नॉईज कॅन्सलींग हेडफोन, किती आहे किंमत..  title=

मुंबई : तुम्हाला जर उत्कृष्ट क्वालिटीसोबत म्युझिकचा आनंद लूटायचा आहे. तर, सोनी कंपनी तुमच्या मदतीला येऊ शकते. सोनीने नुकताच आपला नॉईज कॅन्सलींग हेडफोन लॉन्च केला आहे. ज्याची किंमत पाहून तुमच्या भूवया काहीशा उंचावतील. पण, तुम्ही जर म्युझिकचे शौकिन असाल तर, तुम्ही खरेदीचे धाडस दाखवाल...

सोनीचा हा नवा कोरा हेडफोन ही आपल्या नॉईज कॅन्सलेश हेडफोनचीच पुढची सिरीज आहे. शुक्रवारी याच सिरीजमधले चार हेडफोन सोनीने लॉन्च केले. या चीरहू हेडफोन्सची किंमत 14,990 पासून सुरू होते.

नव्या हेडफोन्समध्ये WH-1000XM2, WH-H900N, WF-1000X आणि WI-1000X चा समावेश आहे. ज्यांची किंमत अनुक्रमे 29,990 रुपये, 18,990 रुपये, 14,990 रुपये आणि 21,990 रुपये इतकी आहे.

प्रेशर ऑफ्टिमाईजिंग फिचर्स

नव्या हेडफोनबाबात माहिती देताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'WH-1000XM2' आणि 'WF-1000X' या हेडफोनमध्ये पर्सनल आणि अॅटमॉसफेरिक प्रेशर ऑफ्टिमाईजिंग फिचर्स आहेत. जे युजर्सच्या वापराच्या हिशोबाने अॅडजस्ट करता येतात. म्युझिक ऐकताना हे हेडफोन आनंदाची अनुभूती देतात.

आवडीनुसार बदला आवाजाची पातळी

'डब्ल्यूएच-1000एक्सएम2', 'डब्ल्यूएफ-1000एक्स' आणि 'डब्ल्यू1-1000एक्स' हे हेडफोन सोनीची इंटेग्रेटड टेक्नॉलजी 'सेन्स इंजिन'सोबत येते. जी प्रत्येक आवाद पर्सनाईज एक्सपिरियन्स देते. तसेच, तुम्हाला हव्या त्या पद्धतीने आवाजाची पातळीही बदलता येते.

10 मिनिटात 70 मिनिटांचा बॅटरी बॅकअप

'डब्ल्यूएच-1000एक्सएम2' या हेडफोनची बॅटरी लाईफ ऑडिओच्या केबलसह 40 तास आणि वायरलेस मोडमध्ये 30 तास इतकी आहे. यात क्विक चार्जर सिस्टमही आहे. या सिस्टमचे वैशिष्टय् असे की, ही सिस्टम केवळ 10 मिनिटात 70 मिनीटांचा बॅटरी बॅकप देते. तर, 'डब्ल्यूएफ-1000एक्स'  चार्जिंग केस सोबत येतो. जो 9 तासांपर्यंत चालतो. 'डब्ल्यूएच-1000एक्सएम2'  आणि 'डब्ल्यूएच-एच900एन' यात क्विक अटेंन्शन मोड आहे. हा मोड उत्कृष्ट म्यूजिक एक्सपिरियन्स देतो. हा आवाजालाही कंट्रोल करतो आणि याचा लूकही शानदार दिसतो.