भिंतीवर AC सारखा लटकणारा जगातील पहिला कूलर; जाणून घ्या याचे फीचर्स

कमी पॉवरमध्ये हा कूलर एसीसारखी थंड हवा देईल. 

Updated: May 16, 2022, 05:56 PM IST
भिंतीवर AC सारखा लटकणारा जगातील पहिला कूलर; जाणून घ्या याचे फीचर्स title=

मुंबई : भारतात उष्णता झपाट्याने वाढत चालली आहे. देशाची राजधानी दिल्लीत 15 मे रोजी तापमान 47 अंशांवर होते.  उष्ण वाऱ्यासह कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांचे हाल झाले. ज्यामुळे लोक उष्णतेपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांकडे वळत आहेत. उष्णते पासून वाचण्यासाठी एसी हा एक चांगला पर्याय वाटत असला तरी, तो सर्वांनात परवडणार नसतो. ज्यामुळे लोक एक्ट्रा पंखा किंवा मग कुलचा पर्याय निवडताच. परंतु बऱ्याचदा कमी जागेमुळे लोकं कूलर देखील विकत घेण्यासाठी 4 वेळा विचार करतात. तुम्ही देखील कमी जागेमुळे कुलर घेण्याचा पर्याय स्किप करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय समोर आला आहे.

हा पर्याय म्हणजे एसी कम कुलर, खरंतर हा कुलरच आहे. परंतु तो एसीप्रमाणे तुम्ही भिंतीवरती लावू शकता. ज्यामुळे एकतर तुमची जागा वाचेल, तर दुसरं म्हणजे आपल्याला एसी सारखी फिलिंग मिळेल.

कमी पॉवरमध्ये हा कूलर एसीसारखी थंड हवा देईल. सिम्फनीने अलीकडेच एक नवीन कुलर सादर केला आहे, जो एसीप्रमाणे भिंतीवर लटकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया...

सर्व काम रिमोटद्वारे होईल

आम्ही Symphony Cloud बद्दल बोलत आहोत हा असा कुलर आहे जो थंडावा देतो, तसेच यात पुन्हा पुन्हा पाणी ओतण्याची गरज भासणार नाही.

रिमोटसह सिम्फनी क्लाउड पर्सनल कूलर

सिम्फनी क्लाउड पर्सनल कूलरची क्षमता 15 लिटर आहे. म्हणजेच 15 लिटरची पाण्याची टाकी आहे. ते सुमारे 2000 चौरस फूट क्षेत्रफळ थंड करते. हे थ्री साइड कूलिंग पॅडसह येते. अगदी कडक उन्हाळ्यातही ते घर थंड करू शकते. आर्द्रता काढून टाकण्यासाठी त्यात डिह्युमिडिफायिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

रिमोटसह सिम्फनी क्लाउड पर्सनल कूलरची लॉन्चिंग किंमत 14,999 रुपये आहे, परंतु या कुलर फ्लिपकार्टवरून 11,899 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. म्हणजेच कूलरवर 20% सूट दिली जात आहे. कूलरवर बॅक ऑफर देखील आहे, ज्यामुळे कूलरची किंमत आणखी कमी होऊ शकते. याशिवाय ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे. ज्यामुळे महिन्याला एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत ईएमआयद्वारे कुलर घरी आणता येतो.