टाटा हॅरीअर लॉन्च, पाहा फिचर्स आणि किंमत

सध्या भारतीय बाजारात चारचाकी गाड्यांमध्ये एसयूव्ही गाड्यांना चांगली पसंती मिळत असल्याचं पहायला मिळतयं. 

Updated: Dec 9, 2018, 07:50 AM IST
टाटा हॅरीअर लॉन्च, पाहा फिचर्स आणि किंमत  title=

मुंबई : सध्या भारतीय बाजारात चारचाकी गाड्यांमध्ये एसयूव्ही गाड्यांना चांगली पसंती मिळत असल्याचं पहायला मिळतयं. त्यातच दिल्ली ऑटो एक्स्पो मध्ये टाटानी त्यांची एसयूव्ही श्रेणीतील नवी हॅरीअर ही गाडी लॉन्च केली. टाटा मोटर्सची नवी एसयूव्ही टाटा हॅरीअरची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. टाटा हॅरीअरची झलक दिल्लीतल्या ऑटो एक्स्पोमध्ये पहायला मिळाली आणि आता हॅरीअर बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

शानदार लूक 

ह्युंदाईची क्रेटा आणि महिंद्राची एक्सयूव्ही ५०० शी हॅरीअरची स्पर्धा असणार आहे. या गाडीचं एक्सटीरीअर अतिशय बोल्ड करण्यात आलं आहे. गाडीचे व्हिल्स सुध्दा आकर्षक करण्यात आले आहेत. ही गाडी जेंव्हा रस्त्यावर येईल तेंव्हा ती मनाचा ठाव घेणार हे निश्चित मानल जातय.

HDI प्रोजेक्टर हेडलॅम्पस,तर टेललाईटमध्ये hd led लाईटस वापरण्यात आले आहेत. डोर हॅण्डल्सना क्रोम फिनिशींग देण्यात आलं आहे. ५ स्पोक अलॉय व्हिल्समुळे हॅरीअर एकदमच भारदस्त दिसते तर इंटिरीअरमध्ये ओक ब्राऊन रंगाचा वापर करण्यात आला आहे.

डॅश बोर्डला ओक वूड फिनिशींग देण्यात आलं आहे. गाडीत लेग रूम आणि हेडरूम चा विशेष विचार केलेला दिसतोयं. स्टेअरिंग व्हिलला लेदर फिनिशींग देण्यात आलं आहे.

सुरक्षित ड्रायव्हिंग 

 सुरक्षेच्या दृष्टीनेही हॅरीअरमध्ये विशेष काळजी घेतलेली दिसते. 6 एअरबॅग्स बरोबरच एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ऑफ रोड ABS, इलेक्ट्रॉनिक स्टैबिलिटी कंट्रोल यासारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर फॉग लैम्प, रिवर्स पार्किंग कॅमेरा आणि साधारण सर्वच गाड्यांमध्ये उपलब्ध असणारी  ड्राइवर आणि को-ड्राइवर सीट बेल्ट रीमाइंडर दिला आहे.

फिचर्स  

गाडी चालवताना ड्राइविंगचा आनंद वाढावा यासाठी तीन विविध मोड देण्यात आले आहेत.

यात सिटी,इको आणि स्पोर्टी मोड देण्यात आले आहेत. 1956CC इतकी क्षमता असलेलं इंजिन,350NM टॉर्क, 50 लिटर क्षमतेची इंधन टाकी, 6 स्पिड गिअर्स,पुढच्या व्हिलला डिस्क ब्रेक, तर मागे ड्रम ब्रेक, आणि ड्राइविंग करताना संगीताचा आनंद घेता यावा यासाठी 9 JBL स्पिकर्स देण्यात आले आहेत.

एकूणच अत्याधुनिक सुविधांसह टाटा हॅरिअर आता प्रत्यक्ष रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. दिल्लीमध्ये ही कार वेगवेगळ्या व्हेरिएंट्सनुसार 13 ते 18 लाखांपर्यंत मिळतेय.