टोयोटाची नवीन दमदार कार, अनेक लोकप्रिय कार्सना देणार धक्का!

टोयोटा लवकरच आपली नवीन सिडेन यारिस ही जबरदस्त कार बाजारात घेऊन येणार आहे. ही सी सेगमेंटची कंपनीची पहिली कार आहे. 

Amit Ingole Updated: Mar 13, 2018, 10:42 AM IST
टोयोटाची नवीन दमदार कार, अनेक लोकप्रिय कार्सना देणार धक्का!

नवी दिल्ली : टोयोटा लवकरच आपली नवीन सिडेन यारिस ही जबरदस्त कार बाजारात घेऊन येणार आहे. ही सी सेगमेंटची कंपनीची पहिली कार आहे. 

कधी होणार लॉन्च?

ही कार यावर्षी मे महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. १.५ लीटर पेट्रोल इंजिन असलेल्या या कारमध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि ७ स्पीड सीवीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. 

कधीपासून बुकिंग?

या कारची बुकिंग पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे भारतात या कारची स्पर्धा वेगवेगळ्या लोकप्रिय कंपन्यांसोबत असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात मारूती सुझुकी सियाझ, होंडा सिटी, ह्युंदाई वर्ना आणि फोक्सवॅगन वेंटो या कार्सचा समावेश आहे. 

किती असू शकते किंमत?

फीचर्सबाबत सांगायचं तर नव्या टोयोटा सिडेनमध्ये रूफ माऊंटेड रिअर एसी वेंट्स, पॉवर अ‍ॅडजेस्टेबल फ्रन्ट सीट. सात एअरबॅग्स आणि फ्रन्ट पार्किंग सेंसर प्रमुख आहेत. या नव्या कारची किंमत भारतात १० ते १२ लाख रूपये असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.