आपल्या फोनचा इंटरनेट स्पीड किती आहे? फक्त १० सेकंदात घ्या जाणून

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॅरिटी ऑफ इंडियाने नवे अॅप लाँच केलय. याच्या मदतीने युझर्स इंटरनेटचा स्पीड चेक करु शकतात. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 29, 2017, 06:09 PM IST
आपल्या फोनचा इंटरनेट स्पीड किती आहे? फक्त १० सेकंदात घ्या जाणून title=

मुंबई : टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॅरिटी ऑफ इंडियाने नवे अॅप लाँच केलय. याच्या मदतीने युझर्स इंटरनेटचा स्पीड चेक करु शकतात. 

या अॅपचे नाव MySpeed असे आहे. या अॅपच्या मदतीने यूझर्स १० सेकंदात इंटरनेट स्पीड चेक करु शकतात. हे अॅप जिओ, एअरटेल, आयडिया, व्होडाफोन, बीएसएनएल, एअरसेलसह टेलिकॉम कंपन्यांचा इंटरनेट स्पीडची माहिती देते.

असे इन्स्टॉल करा हे अॅप

सर्वात आधी गुगल प्ले स्टोरमधून MySpeed(TRAI)फ्री अॅपला इन्स्टॉल करे. या अॅपची साईझ ८ एमबी आहे. जेव्हा तुम्ही हे ओपन करता तेव्हा काही मेसेज येतात. त्यावर ok आणि Allow करावे लागेल. 

आता स्पीड टेस्ट Begin Test वर क्लिक करा. यावेळी तुमच्या फोनवर डाऊनलोड आणि अपलोड स्पीड टेस्ट सुरु होईल. स्पीड Mbpsमध्ये मोजला जातो. 

डाऊनलोड आणि अपलोड स्पीड काऊंट झाल्यानंतर रिझल्ट समोर येतो. यातून टेलिकॉम नेटवर्कशी संबंधित डिटेल्स दिल्या जातील. यूझर्स हा रिझल्ट TRAI लाही पाठवू शकतात. 

अॅपमध्ये लोकेशनचा पर्यायही देण्यात आलाय. याच्या मदतीने यूझर्स आपल्या विभागातील टेलिकॉम ऑपरेटर्सचा स्पीड एकाचवेळी चेक करु शकतात. ऑपरेटर्सची नावे अल्फाबेटने असतात.