UC ब्राऊजरवर भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला पाठवल्याचा आरोप

आपल्यापैकी अनेकजण हे मोबाईलमध्ये UC ब्राऊजर वापरत असल्याचं पहायला मिळतं. तुम्हीही UC ब्राऊजरचा वापर करता? तर मग ही बातमी तुम्ही नक्की वाचा. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 23, 2017, 09:21 AM IST
UC ब्राऊजरवर भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला पाठवल्याचा आरोप title=

नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकजण हे मोबाईलमध्ये UC ब्राऊजर वापरत असल्याचं पहायला मिळतं. तुम्हीही UC ब्राऊजरचा वापर करता? तर मग ही बातमी तुम्ही नक्की वाचा. 

भारतीय युजर्सच्या मोबाईलमधील डेटा कथित स्वरुपात लीक करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने चौकशीही सुरु केली आहे. वरिष्ठ अधिका-यांनुसार, या प्रकरणात दोषी आढळल्यास UC ब्राऊजरवर बंदीही घातली जाऊ शकते. 

UC ब्राऊजर हे चीनमधील प्रसिद्ध कंपनी अली बाबाचं ब्राऊजर आहे. या ब्राऊजरवर भारतीय युजर्सशी संबंधित माहिती लीक करण्याचा आरोप आहे. 

सुत्रांच्या मते, UC ब्राऊजरने युजर्सच्या मोबाईल नंबरसोबतच इतरही माहिती चीनला पाठवली आहे. UC ब्राऊजर भारतीय ग्राहकांचे इंटरनॅशनल मोबाईल सबस्क्राईबर आयडेंटिटी आणि आयएमईआय म्हणजेच इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटीची माहिती चीनमध्ये असलेल्या रिमोट सर्व्हरला पाठवली आहे.

मोबाईलमध्ये UC ब्राऊजर चालू करताच वायफाय डिटेल आणि नेटवर्क इन्फॉर्मेशन चीनच्या सर्व्हरला मिळते. सुत्रांच्या मते, भारतीय जवळपास ५० टक्के ब्राऊजर बाजारावर UC ब्राऊजरचं वर्चस्व आहे. २०१५ साली यूनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोने पहिल्यांदा UC ब्राऊजर संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.