Video: सनरुफमधून बाहेर येऊन जोडप्याचे अश्लील चाळे! धावत्या SUV च्या छतावर...

Viral Video Couple On Sunroof SUV: हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ या कारच्या मागून जाणाऱ्या कारमधील व्यक्तीने शूट केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 28, 2023, 01:31 PM IST
Video: सनरुफमधून बाहेर येऊन जोडप्याचे अश्लील चाळे! धावत्या SUV च्या छतावर... title=
व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं

Viral Video Couple On Sunroof SUV: काहीतरी हटके करण्याच्या नादात आणि सवंग प्रतिद्धीच्या हव्यासापोटी अनेकजण आपला जीव धोक्यात घालतात. रस्त्यावर तर असे अनेक नमुने दिसून येतात हे आपल्याबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालतात. अनेकदा तर प्रेमीयुगूलं वाहन चालवतानाच स्टंटबाजी करताना दिसतात. केवळ बाईक्स आणि दुचाकींवर नाही तर धावत्या कारमध्येही अशाप्रकारची स्टंटबाजी केल्याची उदाहरणं पाहायला मिळतात. अशी स्टंटबाजी ही कायद्यानुसार दंडास पात्र असते. त्यातच आता रनरुफमधून बाहेर येण्याचं नवीन फॅड चर्चेत असून यामुळेही गाडीतून प्रवास करणाऱ्यांबरोबर आजूबाजूच्या लोकांची सुरक्षाही धोक्यात येते.  

सनरुफ बाहेर डोकावणे कायद्याने गुन्हा

अशाप्रकारे धावत्या कारमधून सनरुफमधून बाहेर डोकावणे कायद्याने गुन्हा आहे. यापूर्वीही अनेकदा पोलिसांनी अशाप्रकारे धावत्या कारच्या छतामधून बाहेर डोकावणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. बरेच जण स्वत: अशाप्रकारे थ्रीलच्या नादात सनरुफमधून बाहेर डोकावतात. तर काहीजण आपल्या मुलांना वेगाचा अनुभव घेता यावा म्हणून अशा धोकादायक पद्धतीने त्यांना सनरुफबाहेर डोकं काढू देतात. मात्र आता या सनरुफ ट्रेण्डमधील एक फारच धक्कादायक व्हिडीओ हैदराबादमधून समोर आला आहे.

कारच्या छप्परावर बसून अश्लील चाळे

तेलंगणमधील या व्हिडीओमध्ये किया सिलेटोज गाडीच्या सनरुफमधून बाहेर येऊन छप्पराचा कठड्यासारखा वापरत करत त्यावर बसल्याचं दिसत आहेत. रात्रीच्या वेळी शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये दोघेहीजण एकमेकांचं चुंबन घेताना आणि अश्लील चाळे करताना दिसत आहेत. गाडी अगदी वळणावरुन ही गाडी जात असताना हे दोघे निवांतपणे कारच्या छतावर बसल्याचं दिसत आहेत. रोड्स ऑफ मुंबई नावाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या कारचा क्रमांक व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ या कारच्या मागून धावणाऱ्या कारमधील एका व्यक्तीने शूट केल्याचं दिसत आहे. नेमका हा व्हिडीओ हैदराबाद शहरातील कोणत्या भागामध्ये आणि कधी शूट करण्यात आला हे मात्र सांगण्यात आलेलं नाही.

सावध राहा

मात्र अशाप्रकारची स्टंटबाजी जीवावर बेतू शकते. त्यामुळेच असा कोणताही प्रकार कधीही करुन नये किंवा सोबतच्यांना करु देऊ नये असं पोलीस अनेकदा जनजागृतीदरम्यान सांगतात. अशाप्रकारची स्टंटबाजी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. गंभीर प्रकरणांमध्ये अगदी लायसन्स रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्याचा हक्कही पोलिसांना असतो. त्यामुळे अशा नको त्या स्टंटबाजीपासून चार हात लांब राहिलेलं फायद्याचं ठरतं.