पोस्टपेड ग्राहकांसाठी वोडाफोनचा जबरदस्त प्लॅन...

वोडाफोनने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 30, 2017, 02:28 PM IST
पोस्टपेड ग्राहकांसाठी वोडाफोनचा जबरदस्त प्लॅन... title=

नवी दिल्ली : वोडाफोनने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे. रेड टुगेदर असे या प्लॅनचे नाव आहे. प्लॅनच्या अंतर्गत ग्राहकांना डेटा रोलओव्हरची सुविधा मिळत आहे. तसंच त्यात 200 जीबी डेटा मिळेल. 
त्याचबरोबर रेड टुगेदर हा प्लॅन घेणाऱ्या ग्रुपमधील सदस्यांना 20 जीबी एक्स्ट्रा डेटाही मिळेल. ३९९ रूपयांत तुम्ही या प्लॅनचा लाभ घेऊ शकता.

सर्व नंबरचे एकच बिल

याचा फायदा ग्रुपमधील सर्व सदस्यांना मिळेल. यासाठी तुम्हाला वोडाफोनचा रेड टुगेदर पोस्टपेड हा प्लॅन घ्यावा लागेल. प्लॅनमध्ये कुटुंबातील इतरांचे नंबर जोडता येतील. त्यानंतर सर्व नंबरचे एकच बिल जनरेट होईल. त्यामुळे ग्राहकांना २०% फायदा मिळेल.

प्लॅनमध्ये काय काय मिळणार ?

वोडाफोन रेड टुगेदर प्लॅनचे मासिक रेंटल ३९९ रूपये असेल. त्यापेक्षा अधिक किंमतीचा प्लॅन घेतल्यास अधिक लोक प्लॅनमध्ये सहभागी होऊ शकतात. वोडाफोनच्या रेड प्लॅनमध्ये 10 जीबी डेटा त्याचबरोबर अनलिमिटेड फ्री लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळत आहे. मात्र वोडाफोन टुगेदर प्लॅनमध्ये ग्राहकांना 20 जीबी पर्यंत अतिरिक्त डेटा मिळेल. 

डेटा रोलओव्हरची सुविधा

रेड टुगेदर प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा रोलओव्हरची सुविधा मिळेल. म्हणजे एखाद्या महिन्यात डेटा पुर्ण वापरला गेला नाही तर तो पुढच्या महिन्यात वापरता येईल.  पुढच्या महिन्याच्या अकाऊंटमध्ये तो कॅरी फॉरवर्ड होईल. 200 जीबी डेटा रोलओवर होऊ शकतो.