व्होडाफोननं सुरु केले ५ नवे प्लान्स

व्होडाफोननं ग्राहकांसाठी ५ नव्या प्लान्सची घोषणा केली आहे. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 2, 2017, 04:53 PM IST
व्होडाफोननं सुरु केले ५ नवे प्लान्स  title=

मुंबई : व्होडाफोननं ग्राहकांसाठी ५ नव्या प्लान्सची घोषणा केली आहे. सुपर प्लान असं नाव व्होडाफोननं या प्लान्सना ठेवलं आहे. या नव्या प्लानमध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटा, एसएमएस, लोकल-एसटीडी-राष्ट्रीय आणि रोमिंग कॉल्सची सुविधा एकत्र देण्यात आली आहे. व्होडाफोनचे हे सगळे प्लान्स 2G,3G/4G हँडसेट्ससाठी उपलब्ध आहेत.

हे आहेत व्होडाफोनचे नवे प्लान्स

५०९ रुपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला 1GB इंटरनेट डेटा, प्रत्येक दिवशी १०० एसएमएस, अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि राष्ट्रीय रोमिंग कॉल्स ८४ दिवसांसाठी मिळणार आहेत. ४५८ रुपयांच्या प्लॅनमध्ये हीच सुविधा ७० दिवसांसाठी आणि ३४७ रुपयांच्या प्लॅनमध्ये (1.5GB डेटा दिवसाला) २८ दिवसांसाठी देण्यात आली आहे. 

या सुविधा मिळणार

३४७ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड रोमिंग, एसटीडी आणि लोकल कॉलिंग आणि दिवसाला 1.5GB इंटरनेट डेटा २८ दिवसांसाठी मिळणार आहे. तर ४५८ आणि ५०९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना कॉलिंग, एसटीडी, रोमिंग, एसएमएस आणि इंटरनेट डेटाची सुविधा असणार आहे. व्होडाफोनचे हे नवे प्लान्स सगळ्या स्टोर्स आणि माय व्हो़डाफोन अॅपमधून विकत घेता येणार आहेत.