जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीचा नवा प्लॅन

व्होडाफोन इंडिया रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लॅन घेऊन आली आहे.

Updated: Oct 26, 2017, 04:20 PM IST
जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीचा नवा प्लॅन  title=

मुंबई : व्होडाफोन इंडिया रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लॅन घेऊन आली आहे. अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटासाठी व्होडाफोननं सुपरवीक प्लॅन लॉन्च केला आहे. ६९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि ५०० एमबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी ७ दिवसांपर्यंत असणार आहे.

रिलायन्स जिओनं याआधीच त्यांच्या प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये बदल केले आहेत. ५२ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला १५० एमबी म्हणजेच एकूण १.०५ जीबी डेटा मिळणार आहे. ७ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी कॉल आणि रोमिंगची सुविधा मिळणार आहे.