'त्या' प्रकरणी व्हॉट्सअॅपने यूजर्सची मागितली माफी

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये शुक्रवारी दुपारी काही काळासाठी व्हॉट्सअॅप बंद झाले होते. यामुळे व्हॉट्सअॅपवरुन येणारे जाणारे मेसेज अचानक बंद झाल्याने काय घडले हे नेमके लोकांना कळेना.

Updated: Nov 3, 2017, 11:16 PM IST
'त्या' प्रकरणी व्हॉट्सअॅपने यूजर्सची मागितली माफी title=

मुंबई : भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये शुक्रवारी दुपारी काही काळासाठी व्हॉट्सअॅप बंद झाले होते. यामुळे व्हॉट्सअॅपवरुन येणारे जाणारे मेसेज अचानक बंद झाल्याने काय घडले हे नेमके लोकांना कळेना.

या गडबडीबद्दल व्हॉट्सअॅपने यूझर्सची माफी मागितली आहे. व्हॉट्सअॅप प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी जगभरात व्हॉट्सअॅप एक तासासाठी बंद होते. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. व्हॉट्सअॅपमधील ही त्रुटी दूर कऱण्यात आली असून त्रासाबद्दल आम्ही माफी मागतो. 

स्वतंत्र वेबसाईट डाउनडिटेक्टरच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या ६० टक्के यूझर्सना या त्रासाचा सामना करावा लागला. दरम्यान ही समस्या सोडवण्यात आलीये आणि यूझर्स मेसेज पाठवू शकतायत. 

एक्सप्रेस डॉटला डॉट युकेने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप बंद असताना २५ टक्के लोकांना मेसेज प्राप्त करण्यात अडचणी येत होते. अनेकांनी यावेळी ट्विटरची मदत घेत व्हॉट्सअॅप बंद झाल्याबाबत संताप व्यक्त केला. यादरम्यान सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपडाऊन हा हॅशटॅग ट्रेंड करत होता.