WhatsApp : मोठ्या ग्रुपचं नोटिफेकशन आपोआप होणार...

New Feature :   WhatsApp वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट फीचर घेऊन येतं असतो.  WhatsApp यूजर्ससाठी (users) आता आनंदाची बातमी आहे. WhatsApp वरील ग्रुपसंदर्भात कंपनी नवीन फीचर आणाच्या तयारीत आहेत. 

Updated: Oct 23, 2022, 06:57 AM IST
WhatsApp :  मोठ्या ग्रुपचं नोटिफेकशन आपोआप होणार... title=
WhatsApp Feature Update group notification nmp

WhatsApp Feature Update: WhatsApp आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिवाळी गिफ्ट (Diwali Gift) देणार आहे. WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय अॅप आहे. या अॅपद्वारे आपण जगात कुठेही कोणाशीही संपर्कात राहू शकतो. सोशल मीडियाच्या जगात नवीन नवीन अॅप येतं असतात. म्हणून WhatsApp वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट फीचर घेऊन येतं असतो.  WhatsApp यूजर्ससाठी (users) आता आनंदाची बातमी आहे. WhatsApp वरील ग्रुपसंदर्भात कंपनी नवीन फीचर आणाच्या तयारीत आहेत. 

ग्रुप नोटिफेकशनच्या त्रासापासून मुक्तता

WhatsApp प्रत्येक जण अशा अनेक ग्रुपमध्ये असतात ज्यामध्ये अनेक लोक असतात. मग अशावेळी या ग्रुपवर सतत मेसेज येतात आणि त्या मेसेजच्या नोटिफेकशन
आवाज सतत मोबाईलवर वाजत असतो. मग अशावेळी आपण हे ग्रुप म्यूट करुन ठेवतो. पण आता कंपनी या ग्रुप मेसेजच्या आवाजसंदर्भात एक दमदार फीचर (unique features) घेऊन येत आहे. (WhatsApp Feature Update group notification nmp)

मोठ्या ग्रुपचं नोटिफेकशन आपोआप होणार...(notification on the big group)

मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर एक नवीन पॉवरफुल फीचर घेऊन येतं आहे, जे अधिक सदस्य असलेल्या ग्रुपवर इनकमिंग मेसेजचं नोटिफिकेशन आपोआप म्यूट करेल.  ग्रुपमध्ये 512 पेक्षा जास्त लोक अॅड होताच नोटिफिकेशन्स आपोआप बंद (Notifications will be muted automatically) होतील आणि तुम्हाला सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. हे वैशिष्ट्य कोणत्याही वापरकर्त्यावर लादलं जाणार नाही कारण तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही ग्रुपवर येणार्‍या नोटिफिकेशन्स अन-म्यूट देखील करू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा ते म्यूट देखील करू शकता.