Whats App चं नवं सेक्युरिटी फिचर, कोणीही घेऊ शकत नाही तुमच्या फोटो आणि व्हिडीओचा स्क्रीनशॉट!

WhatsApp चं भन्नाट Feature, तुमचे फोटो आणि व्हिडीओ आता सुरक्षित

Updated: Oct 5, 2022, 04:08 PM IST
Whats App चं नवं सेक्युरिटी फिचर, कोणीही घेऊ शकत नाही तुमच्या फोटो आणि व्हिडीओचा स्क्रीनशॉट! title=

WhatsApp Feature: मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय अ‍ॅप्सपैकी एक आहे. आजच्या काळात प्रत्येकाच्या मोबाईमध्ये तुम्हाला हे अ‍ॅप मिळेल. भारतातच काय तर सगळ्या देशात वापरले जाते. WhatsApp आपल्या यूजर्ससाठी नेहमीच काहीतरी वेळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. व्हॉट्सअॅपचं नवं फिचर्स  (WhatsApp new feature) घेऊन येणार आहे. या फिचरमुळे, कोणीही तुमच्या फोटो आणि व्हिडीओचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही.

अनेकदा चॅट करताना लोकं काही पर्सनल फोटो किंवा व्हिडीओ व्यू वन्सद्वारे शेअर (WhatsApp view once messages) करत असतात. एखादा फोटो गॅलरीमध्ये राहू नये किंवा पुन्हा पाहता येऊ नये, यासाठी हे फिचर व्हॉट्स अॅपने तयार केलं आहे. मात्र, अनेकदा फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा पाहता यावा यासाठी अनेकजण स्क्रीनशॉट घेतात. त्यामुळे प्रायवसी भंग होण्याचा धोका असतो. अशातच आता WhatsApp नवं Feature आणण्याच्या तयारीत आहे.

WaBetaInfo च्या रिपोर्टनुसार, वन वन्सच्या फोटो आणि व्हिडीओचे स्क्रीनशॉट बंद व्हावे, असं मार्क जुकरबर्ग यांना वाटतंय. त्यामुळे कंपनीकडून ऐपच्या नव्या व्हर्जनची टेस्ट केली जाणार आहे. ज्यामुळे वापरकर्त्याला स्क्रीनशॉट घेता येणार नाही (WhatsApp updates News).

WhatsApp ने चालू वर्षीच्या सुरूवातीला व्यू वन्स नावाचं फिचर आणलं होतं. आता नव्या फिचरमुळे वापरकर्त्यांना स्क्रीनशॉट घेण्याचा पर्याय असणार नाही. जर स्क्रीनशॉट घेतला तर फक्त काळी स्क्रीन दिसेल. त्यामुळे खुला संवाद करणे शक्य होणार आहे.

आता एकाच फोनमध्ये दोन WhatsApp Account वापरणे शक्य; फक्त या स्टेप्स फॉलो करा

दरम्यान, WaBetaInfo च्या दाव्यानुसार युझर्ससाठी WhatsApp ने पोलिंग कैपिबिलिटीज जारी करत आहे. Android साठी WhatsApp बीटा, आवृत्ती 2.22.21.16 च्या नवीनतम अपडेटसह, काही बीटा वापरकर्ते चॅट करण्यासाठी सक्षम (whatsapp upcoming feature) असणार आहेत.