Whatsapp : दिवाळीपासून 'या' मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर चालणार नाही

व्हॉट्सअ‍ॅपमधून पेमेंट (Whatsapp Payment) करण्याची सुविधाही आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांचा मोठा असा वर्ग आहे. 

Updated: Oct 20, 2022, 08:41 PM IST
Whatsapp : दिवाळीपासून 'या' मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर चालणार नाही title=

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपचा (Whatsapp) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सध्या मेसेजिंगसह इतर फायद्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपमधून पेमेंट (Whatsapp Payment) करण्याची सुविधाही आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांचा मोठा असा वर्ग आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅप यूझर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. दिवाळीपासून मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नाही. त्यामुळे यूझर्सच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. (whtsapp not support in iphone ios 10 and ios 11 also android system)

आयफोनच्या जुन्या व्हर्जनमध्ये आणि एंड्रोइड मोबाईलमध्ये 24 ऑक्टोबरपासून  व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर आयओएस आणि एंड्रोइड ऑपरेटिंस सिस्टममध्ये व्हॉट्सअप सपोर्ट करणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे हे जुने मोबाईल आहे, त्यांची चांगलीच गैरसोय होणार आहे.

या मोबाईलमध्ये WhatsApp चालणार नाही

जे आयफोन  iOS 10 आणि iOS 11 चालतात, त्यात व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. एकूणच या ऑपरेटिंग सिस्टीमवाल्या आयफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट होणार नाही. तसेच आयफोन 5 आणि आयफोन 5 सी यूझर्सही व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकत नाही.  व्हॉट्सअ‍ॅप काही अपडेट्स आणत आहे. हे अपडेट्स या मोबाईलमध्ये  सपोर्ट करणार नाहीत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने या मोबाईलमध्ये आपली सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतलाय.