जगातील पहिला १००० जीबी स्टोरेज देणारा स्मार्टफोन लॉंच

 ज्यामध्ये १ टीबी स्टोरेज क्षमता असणारा स्मार्टफोन लॉंच केलाय. 

Updated: May 19, 2018, 11:43 AM IST
 जगातील पहिला १००० जीबी स्टोरेज देणारा स्मार्टफोन लॉंच title=

नवी दिल्ली : स्मार्टफोनच्या दुनियेत सध्या चीनी कंपन्यांचाच बोलबाला आहे. पण चीनमध्ये असे काही स्मार्टफोन आहेत ज्या कंपन्यांना पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नाही पण तरीही त्यांच काम वेगानं सुरू आहे.  Smartisan (स्मार्टिसन) ही त्यातीलच एक कंपनी आहे. ज्यामध्ये १ टीबी स्टोरेज क्षमता असणारा स्मार्टफोन लॉंच केलाय. कदाचित तुम्ही या कंपनीच नाव ऐकल नसेल. पण स्मार्टफोनच्या फिचर्सकडे तुम्ही दुर्लक्ष करु शकत नाही. या स्मार्टफोनची डिझाइन काही आकर्षक नाही पण याचे फिचर्स दमदार आहेत. 

काय आहेत 'स्मार्टिसन आर १' चे फिचर्स 

ड्युयल सिम

अॅण्ड्रॉइडवर आधारित ऑपरेटींग सिस्टिम

लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर 

 ६ जीबी आणि ८ जीबी रॅम 

६४ जीबी, १२८ जीबी आणि १ टीबी स्टोरेज 

६.१७ इंस प्रेशर सेंसेटिव्ह डिस्प्ले 

डिस्प्ले सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास ३ चा वापर 

३६०० एमएएच बॅटरी

कॅमेरा

ड्युयर रियर कॅमेरा सेटअप 

एक कॅमेरा २० तर दुसरा कॅमरा १२ मेगापिक्सल 

फ्रंट कॅमेरा २४ मेगापिक्सल (नॉच डिस्प्ले) 

किंमत 

स्मार्टिसन आर १ चार व्हेरिअंट्समध्ये आहे.

६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या वेरिएंट्सची किंमत ३७  हजार रुपये

६ जीबी रॅम आणि १२८ जीबी डेटा स्टोरेजच्या वेरिएंट्सची किंमत ४२,७०० रुपये

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी डेटा स्टोरेजच्या वेरिएंट्सची किंमत ४८ हजार रुपये

८ जीबी रॅम आणि १ टीबी डेटा स्टोरेजच्या वेरिएंट्सची किंमत ४८ हजार रुपये

कलर 

हा स्मार्टफोन पूर्ण सफेद आणि कार्बन ब्लॅक रंगात उपलब्ध