शाओमीचा Redmi 6 लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स...

...

Updated: Jun 14, 2018, 08:59 AM IST
शाओमीचा Redmi 6 लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स... title=

नवी दिल्ली : मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने आपला बजेट स्मार्टफोन रेडमी 6 (Redmi 6) आणि रेडमी 6A (Redmi 6A) फोन लॉन्च केला आहे. रेडमी 6 कंपनीतर्फे गेल्यावर्षी लॉन्च करण्यात आलेल्या रेडमी 5 चा अपग्रेड व्हेरिएंट असल्याचं बोललं जात आहे. या नव्या फोनमध्ये अनेक फिचर्स आहेत ज्याममध्ये फेस अनलॉक, 18:9 डिस्प्ले, रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

रेडमी 6 चे स्पेसिफिकेशन

रेडमी 6 (Redmi 6) हा फोन अँड्राईड 8.1 वर चालतो. या फोनमध्ये 5.45 इंचाची 720X1440 पिक्सल रिझॉल्युशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 2 गिगाहर्ट्सचा ऑक्टा-कोअर हिलिओ पी22 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 3GB आणि 4GB रॅम असे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

किंमत आणि उपलब्धता

चायनीज बाजारात लॉन्च केलेला रेडमी 6 हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 799 युआन (जवळपास 8400 रुपये) आहे. तर, 4GB रॅम आणि 64Gb इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 999 युआन (जवळपास 10,500) रुपये आहे. रेडमी 6 या फोनचा पहिला सेल 15 जून रोजी सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे.

शाओमी रेडमी 6 फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 12MP चा प्रायमरी सेंसर आणि 5 MP चा सेकंडरी सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही व्हेरिएंटची इंटरनल मेमरी तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने 256 GB पर्यंत वाढवू शकता.