अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय

९२ व्या अखिल भारतीय साहित्य संम्मेलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

Updated: Jul 1, 2018, 08:37 PM IST

नागपूर : ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संम्मेलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक होणार नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं हा निर्णय घेतलाय..  यापुढे महामंडळच अध्यक्षांची निवड करणार असा निर्णय नागपूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय.. तसेच 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळ पाहणीसाठी वर्धा आणि यवतमाळ या स्थळांची निवड करण्यात आलीये.

ऐतिहासिक निर्णय

आतापर्यतं इथे निवडणूक व्हायची. यातून वाद व्हायचे त्यामुळे निवडणूकीऐवजी निवड सुचविणारी घटनादुरूस्ती करण्यात आली आहे. ९२ वे अखिल भारतीय साहित्य संम्मेलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय मानला जातोय.