Pune News : पुण्यातील प्राणी संग्रहालयातून बिबट्या पसार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pune Rajiv Gandhi Zoological Park News : पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून चक्क बिबट्या पसार झाला आहे. गेल्या 24 तासापासून वन विभागाकडून या बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

Updated: Mar 7, 2024, 04:44 PM IST
Pune News : पुण्यातील प्राणी संग्रहालयातून बिबट्या पसार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्य पिंजऱ्यातुन सोमवारी बिबट्या पसार झाल्याची माहिती समोर आली. विलगीकरण कक्षातील पिंजऱ्यातील बिबट्या पळाल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मात्र बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर आला होता. त्यानंतर गेल्या 24 तासापासून वन विभागाकडून या बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा  बिबट्या मानवी वस्तीत शिरु नये यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे. तसेच प्राणी संग्रहालय बंद ठेवून बिबट्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. या प्राणी संग्रहालयात तीन मादी व एक नर बिबट्या आहेत. हंपीहून आणलेला नर बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. 

तसेच पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून पसार झालेल्या बिबट्याचे नाव "सचिन" आहे. यावेळी "सचिन" सी सी टिव्हीमध्ये कैद झाला असून नागरिकांनी काही काळजी करू नये, भीतीचे कारण नाही असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. आज (5 मार्च 2024) सकाळी तो संग्रहालयातील बॅटरी भागात दिसून आला बिबट्याचा शोध घेण्यासाठी 200 जणं तैनात करण्यात आले आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी थर्मल ड्रॉनचे वापर देखील करण्यात येणार आहे    

बेपत्ता बिबट्या प्राणी संग्रहालयातील पाणवठयाकडे?

मागील 24 तासापासून बेपत्ता असलेला कात्रज प्राणी संग्रहालयाच्या अनाथालयातील बिबट्याचा अजूनही शोध सुरूच आहे. सोमवारी रात्री एका लाडकी ओडक्याच्या आश्रयाला बसलेला बिबट्या पुन्हा दिसेनासा झाला. वनविभागाचे कर्मचारी, फायर ब्रिगेडचे जवान, आणि प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी या बिबट्याचा शोध घेत आहे.. दरम्यान आज (5 मार्च 2024) पहाटेच्या सुमारास या बिबट्याच्या पायाचे ठसे कात्रज प्राणी संग्रहालयातील पानवठ्याजवळ आढळले आहेत. त्यामुळे रात्री हा बिबट पाणी पिण्यासाठी या ठिकाणी आला असावा असा कयास लावला जात आहे. जंगली प्राणी शक्यतो रात्रीच्या वेळेसच पाणी पिण्यासाठी पानवठ्याकडे जात असतात. त्यामुळे हा बिबटही पाणी पिण्यासाठी गेला असण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कात्रज प्राणी संग्रहालय आज बंद ठेवण्यात आले आहे.. 

 प्राणी संग्रहालयात तोतया पोलिसाकडून पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील अनाथालयातून बिबट्या पळून गेल्याचे उघडकीस आले आहे.. मागील 24 तासापासून या बिबट्याचा शोध सुरू आहे.. या दरम्यानच प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर आणखी एक प्रकार उघडकीस आला. पोलीस नसतानाही चारचाकी वाहनावर पोलीस असल्याची नेमप्लेट लावून फिरणाऱ्या एका तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या तोतयाकडे विचारपूस करत असताना त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर मात्र या पोलीस कर्मचाऱ्याने या तोतयाची चांगलीच धुलाई केली. आणि शेवटी ताब्यात घेतले.. हा संपूर्ण प्रकार मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.

अखेर 40 तासांनंतर सापडला

सोमवारी सकाळी नऊ वाजता हाती घेण्यात आलेले शोधकार्य सोमवारी दिवसभर, रात्रभर आणि मंगळवारी दिवसभर सुरू होते. अखेर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास तळ्याजवळ बिबट्या सापडला. त्याला तत्काळ पिंजर्‍यात बंद करण्यात आले. महापालिका, पोलिस व वन विभाग आणि पुणे अ‍ॅनिमल वेलफेअर संस्थेच्या रेस्क्यू टीमसह 150 जणांनी शोधकार्यात योगदान दिले. या शोधकार्यात हायड्रोलिक शिड्या, ड्रोन, थर्मल सेन्सर ड्रोन कॅमेरे आदी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.