Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात जाहीर सभा

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यामध्ये अनेक तुल्यबळ लढती पाहायला मिळतील.   

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात जाहीर सभा

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11, तर देशातील 12 राज्यातील 94 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होतेय. महाराष्ट्रातील ज्या 11 मतदारसंघात मतदान होणाराय, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गचा समावेश आहे. याठिकाणी पवार, नारायण राणे, उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज, राजू शेट्टी अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

7 May 2024, 11:48 वाजता

रायगड लोकसभा मतदार संघातील रोहा तालुक्यातील धाटाव येथील मतदान केंद्रावर evm मशीन बंद पडलं आहे. मागील 45 मिनिट पासून मतदान प्रक्रिया खोळंबली आहे. तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी यंत्रणा पोहोचली आहे. यावेळी मतदार मात्र ताटकळत असून संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे.

7 May 2024, 11:15 वाजता

सकाळी 6 ते 10 पर्यंतची मतदानची आकडेवारी आहे 

  • लातूर : 7.91%
  • सांगली : 5.81 %
  • बारामती: 5 .77%
  •  हातकणंगले : 7 .55%
  •  सोलापूर: 5.93%
  •  कोल्हापूर : 8.04%
  •  रायगड : 6.84%
  • रत्नागिरी सिंधुदुर्ग : 8.17%
  • सातारा : 7.00%

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का

  • बारामती : 7.75%
  • भोर : 5.75%
  • दौंड : 5.50%
  • खडकवासला : 6.00%
  • इंदापूर : 5.00 %
  • पुरंदर : 4.94 %

7 May 2024, 11:01 वाजता

सांगलीच्या पडळकरवाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी लोकशाही मजबूत करण्यासाठी जनतेने जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

7 May 2024, 10:54 वाजता

धक्कादायक! महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू! केंद्रापासून 100 मीटरवर...

महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत असून त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचाही समावेश आहे. मात्र या मतदारसंघामध्ये मतदानाला जाताना एका मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश चीनकटे असं मृत्यू झालेल्या मतदाराचं नाव आहे. नेमकं घडलं काय वाचा येथे क्लिक करुन...

7 May 2024, 10:26 वाजता

"सुनेत्रा पवारांबद्दल वाईट वाटतं, त्यांची दया येते"

सुप्रिया सुळेच बारामती जिंकणार असा विश्वास व्यक्त करताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनेत्रा पवारांना त्यांच्या पतीकडून बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेकडून चौथ्यांदा पराभूत होतील असं भाकित व्यक्त केलं आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त..

7 May 2024, 10:25 वाजता

बारामती सुप्रिया सुळेच जिंकणार; राऊतांनी व्यक्त केला विश्वास

"बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे असं मी अनेकदा म्हणालो आहे. बारामती आम्ही जिंकतोच आहोत. महाविकास आघाडीच्या सुप्रियाताई सुळे जिंकणार हे निश्चित आहे," असं उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "मी सांगतोय ते लिहून ठेवा, विक्रमी मतांनी सुप्रियाताई जिंकणार आहेत," असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

7 May 2024, 09:49 वाजता

सकाळी 9 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी आली समोर

महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.64 टक्के मतदान झालं. यापैकी सर्वाधिक मतदान हे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये झालं. इथे 8.17 टक्के मतदान झालं. तर सर्वात कमी म्हणजेच 4.99 टक्के मतदान माढ्यात झालं आहे. मतदानसंघनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे - 

लातूर - 7.91
सांगली - 5.81
बारामती - 5.77
हातकणंगले - 7.55
कोल्हापूर - 8.04
माढा - 4.99
धाराशिव - 5.79
रायगड - 6.84
रत्नागिरी - 8.17
सातारा - 7
सोलापूर - 5.92

7 May 2024, 09:30 वाजता

राष्ट्रवादी साताऱ्याचा बालेकिल्ला राखणार की भाजप जिंकणार?

7 May 2024, 09:26 वाजता

'रोहित पवारांना अटक करा, त्यांचा फोन तपासा, हातात पैशाच्या बॅगा..'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना मतदानाच्या दिवशीच अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. येथे क्लिक करुन जाणून घ्या यामागील नेमकं कारण काय आहे आणि कोणी केली आहे ही मागणी.

7 May 2024, 08:56 वाजता

शरद पवारांनी काटेवाडी मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

बारामतीमध्येही आज मतदान पार पडत असून राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळेस त्यांच्या कन्या तसेच महाविकास आघाडीच्या बारामतीमधील उमेदवार सुप्रिया सुळेही त्यांच्याबरोबर होत्या. पवारांनी काटेवाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यंदा शरद पवारांनी मुंबईऐवजी बारामतीमध्ये मतदान केलं.