परफ्यूम आणि स्प्रे ठरू शकतात तुमच्या Vaginal health साठी धोकादायक?

योनी मार्गाच्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाठी महिला परफ्यूम किंवा स्प्रेचा वापर करतात. 

Updated: May 30, 2022, 02:48 PM IST
परफ्यूम आणि स्प्रे ठरू शकतात तुमच्या Vaginal health साठी धोकादायक? title=

मुंबई : वजायना म्हणजेच योनी मार्गाच्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाठी महिला परफ्यूम किंवा स्प्रेचा वापर करतात. महिलांनो...तुम्हीही जर असं करत अशाल तर आजच हे परफ्यूम दूर ठेवा, कारण तुमची योनीमार्गाला नैसर्गिक ठेवणं तिच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. 

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या स्वच्छ आणि फ्रेश वाटण्यासाठी हाइजीन प्रोडक्ट्सचा वापर करतात. जसं की डोच, वाइप्स, इंटिमेट क्लीन्सर, डिओड्रंट्स आणि परफ्यूम्स. पण ही उत्पादनं योनीचे आरोग्य राखण्यास खरोखर मदत करतात का? तर नाही.

महिलांच्या योनीमार्गात काही चांगले आणि निरोगी बॅक्टेरिया देखील असतात. योनीमार्गात एक मध्यम मध्यम ऐसिडिक एन्वायरमेंट असतं, जे चांगल्या आणि निरोगी जीवाणूंच्या वाढीस मदत करतं आणि हानीकारक जीवाणूंच्या वाढीला प्रतिबंध करतं.

प्रोबायोटिक्स सारखे चांगले बॅक्टेरिया देखील pH पातळी किंवा वजाइनल एसिडिक वॅल्यूची पातळी राखण्यास मदत करतात. ज्यावेळी महिला योनीमार्गासाठी परफ्यूमचा वापर करतात तेव्हा ते बॅक्टेरिया नष्ट होतात. यामध्ये वजायनाला आवश्यक असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाचा समावेश आहे. याचा परिणाम योनीच्या pH स्तरावर होतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, परफ्यूमचा वापर केल्याने चांगल्या आणि निरोगी बॅक्टेरियाशिवाय, वाईट बॅक्टेरिया आणि यीस्टची वाढ होते. यीस्टच्या वाढीमुळे यीस्टचा इन्फेक्शन देखील होऊ शकतं. ज्यामुळे योनीमार्गात आणि आजूबाजूच्या भागात खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे असे प्रोडक्ट्स वापरणं टाळावं.