Pubic hair काढणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

प्युबिक हेअर काढण्याकडे महिलांचा कल अधिक दिसून येतो. 

Updated: May 29, 2022, 02:00 PM IST
Pubic hair काढणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या title=

मुंबई : आजकाल अनेक महिला गुप्तांगावरील केस काढू इच्छितात. प्युबिक हेअर काढण्याकडे महिलांचा कल अधिक दिसून येतो. असं केल्याने गुप्तांग स्वच्छ राहतं आणि लैगिंक संबंधासाठीही ते सोयीस्कर राहील असं महिलांच्या मनात असतं. मात्र आपल्या शरीरावर नैसर्गिकरित्या असलेले हे केस काढणं किती योग्य आहे.

महिलांच्या शरीराच्या रचनेप्रमाणे त्याची गरज असते. प्युबिक हेअर हे अनावश्यक नाही तर त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून संरक्षण मिळतं. शिवाय यामुळे प्रजनन करण्याच्या अवयवांचं तापमान नीट राखलं जातं.

प्युबिक हेअर काढताना महिलांनी कितीही कालजी घेतली तरी काही प्रमाणात छोटी दुखापत होतेच. त्या ठिकाणी दुखापत झाल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो. काही संशोधनानुसार असं लक्षात आलंय की, प्युबिक हेअर काढल्याने सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीजचा धोकाही बळावतो.

प्युबिक हेअर जर तुम्ही वॅक्सच्या मार्फत काढत असाल तर त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्वचेवरील छिद्रं नीट काम करत नाहीत. शिवाय या अवयवांजवळ बॅक्टेरियांची निर्मिती होण्याचा धोकाही वाढतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, शरीरावर केस असणं चांगलं आहे. या केसांच्या माध्यमातून त्वचेचं संरक्षण होतं. या केसांमुळे अस्वच्छता थेट गुप्तांगाला हानी पोहोचू देत नाही. प्युबिक हेअर काढण्यापेक्षा ते स्वच्छ ठेवले पाहिजेत