सॅनिटरी पॅडमुळे होतोय rashes चा त्रास? कशी दूर कराल ही समस्या

हा त्रास दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

Updated: Jun 3, 2022, 01:58 PM IST
सॅनिटरी पॅडमुळे होतोय rashes चा त्रास? कशी दूर कराल ही समस्या title=

मुंबई : उष्मा वाढल्यामुळे पीरियड्सच्या काळात सॅनिटरी पॅड्समुळे योनीमार्गाजवळ रॅशेज येण्याची समस्या उद्भवते. कदाचित तुम्हालाही या समस्येला सामोरं जावं लागत असेल? उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो हे खरे आहे. योनीच्या आजूबाजूच्या भागावर याचा वाईट परिणाम होतो. यामुळे खाज आणि जळजळ होण्याच्या त्रासालाही सामोरं जावं लागतं. हा त्रास दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

सॅनिटरी पॅड्समुळे पुरळ उठणं, खाज सुटणं, सूज येणं, त्वचा लाल होणं आणि इतर प्रकारचे संक्रमण देखील होऊ शकते. त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोकाही अधिक असतो.

कॉटन अंडरवियरचा वापर

कॉटन अंडरवेअरचा वापर केल्याने योनीमार्गाजवळच्या त्वचेला घट्टपणामुळे घाम येत नाही. यामुळे तुमच्या त्वचेला श्वास घेता येतो. घाम येत नसल्याने ओलावा राहत नाही. त्यामुळे पुरळ येण्याची शक्यता कमी होते.

योग्य पॅडचा वापर

पॅड्समुळे पुरळ उठणं सामान्य आहे, परंतु आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य पॅड निवडणं खूप महत्वाचं आहे. एक चांगलं पॅड जे ओलावा लवकर शोषून घेतो आणि बाहेरील बाजू कोरडी करून त्वचा मऊ ठेवतं. तुमची त्वचा संवेदनशील असल्यास, तुम्ही नेहमी ऑल-कॉटन/ऑरगॅनिक पॅड वापरावं. 

मेंस्ट्रुअल कपचा वापर

मेंस्ट्रुअल कप निवडणं रॅशेजच्या समस्येवर चांगला निर्णय ठरू शकतो. मेंस्ट्रुअल कप हा सॅनिटरी पॅड आणि टॅम्पन्सपेक्षा जास्त रक्त साठवू शकतो. मेंस्ट्रुअल कप बायो-डिग्रेडेबल, स्वस्त, विल्हेवाट लावायला सोपे असतात. त्यांचा वापर करणंही पूर्णपणे सुरक्षित आहे. तसंच ते पुरळ रोखण्यासाठी देखील प्रभावी ठरतात.

इंटीमेट एरियाला कोरडं आणि स्वच्छ ठेवा

इंटीमेट एरिया नेहमी स्वच्छ ठेवा. तो भाग कोरडा असावा. योनीसाठी pH पातळी 3 ते 4.5 असावी याची तुम्ही खात्री करावी. हे बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करते.