या टिप्सने खुलवा ओठांचे सौंदर्य!

आजकाल मुली आपल्या सौंदर्याबाबत अत्यंत जागरुक असतात. 

Updated: Mar 21, 2018, 11:59 AM IST
या टिप्सने खुलवा ओठांचे सौंदर्य! title=

मुंबई : आजकाल मुली आपल्या सौंदर्याबाबत अत्यंत जागरुक असतात. त्यासाठी त्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत सगळ्याचीच काळजी घेतात. सौंदर्यात महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे ओठ. ओठांचे सौंदर्य खुलवण्यासाठी खास टिप्स...

  • ग्रीन टी ऑईलमध्ये अॅँटीऑक्सीडेंटने भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ओठ चमकदार राहतात. फाटलेल्या ओठांवर हा एक प्रभावी उपचार आहे.
  • जोजोबा ऑईल ओठांच्या त्वचेचे पोषण करते आणि त्यामुळे ओठ मुलायम राहतात. यात ब्राऊन शुगर मिसळून हलक्या हाताने ओठांवर लावा. ३-४ मिनिटे मसाज करा. ओठ मऊसूत होतील.
  • गुलाबजल आणि ग्लिसरीन ओठांच्या त्वचेसाठी लाभदायी असतात. त्यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते आणि ओठांचा कोरडेपणा दूर होऊन ओठ मुलायम होतात.
  • फाटलेल्या ओठांवरील मृत त्वचा दूर करण्यासाठी खोबरेल तेलात साखर मिसळून ओठांवर लावा. त्याचा स्क्रब म्हणून वापर करा. त्यानंतर पाण्याने ओठ स्वच्छ धुवा आणि त्यावर लिपबाम लावा.
  • ओठांवरील मृत त्वचा दूर करण्यासाठी सॉफ्ट ब्रशने ओठांवर मसाज करा. त्यासाठी नवीन ब्रश वापरा.
  • कॅनबेरीत व्हिटॉमिन बी३, व्हिटॉमिन बी५ आणि अंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पर्यावरणीय घटकांमुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळता येते.
  • संत्र्यात व्हिटॉमिन ए, सी, मिनरल्स आणि अंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हानिकारक किरणांपासून त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे संत्रयुक्त लिपबाम लावल्याने ओठांना फायदा होतो.
  • ब्लुबेरी युक्त लिपबाम वापरणे फायद्याचे ठरते. ब्लूबेरी अॅँटी-ऑक्सीडेंटने समृद्ध असते. त्यामुळे ओठांचे सौंदर्य खुलवण्यास याचा फायदा होतो.