सऊदी अरबमध्ये घराला आगल्याने १० भारतीयांचा मृत्यू

सऊदी अरबमध्ये एका घराला आग लागल्यामुळे त्यात राहणाऱ्या १० भारतीयांचा मृत्यू झाला आहे तर ६ जण जखमी झाले आहेत. 

Updated: Jul 13, 2017, 09:55 AM IST
सऊदी अरबमध्ये घराला आगल्याने १० भारतीयांचा मृत्यू title=

नवी दिल्ली : सऊदी अरबमध्ये एका घराला आग लागल्यामुळे त्यात राहणाऱ्या १० भारतीयांचा मृत्यू झाला आहे तर ६ जण जखमी झाले आहेत. 

या घटनेसंदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं की, जेद्दाह येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी या घटनेनंतर नजरानला जात आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, 'मला नजरानमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती मिळाली. ज्यामध्ये १० भारतीयांचा मृत्यू झाला आहे आणि ६ जण जखमी आहेत. त्यांनी यावर तेव्हा प्रतिक्रिया दिली जेव्हा विद्या.एस नावाच्या एका महिलेने या घटनेसंदर्भात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत मागितली.