पंचशीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या तालिबान्यांना मोठा धक्का, 350 तालिबानी मारल्याचा दावा

अफगाणची खिंड पंचशीरमध्ये तालिबान्यांची घुसखोरी, कब्जा मिळवण्यासाठी साम दाम दंड भेदाचा तालिबान्यांकडून वापर

Updated: Sep 1, 2021, 04:10 PM IST
पंचशीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या तालिबान्यांना मोठा धक्का, 350 तालिबानी मारल्याचा दावा title=

काबूल: अफगाणिस्तानमध्ये सर्वात कठीण प्रांत असलेल्या पंचशीरवर तालिबान्यांची नजर आहे. त्यासाठी तालिबानी सतत प्रयत्न करत आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानच्या जवळपास सर्व भागांवर कब्जा केला आहे. केवळ पंजशीर एकच प्रांत अजून तालिबानच्या हाती लागलं नाही. हा प्रांत मिळवण्यासाठी तालिबानी सतत लढत आहेत.

नॉर्दर्न अलायन्सनं मात्र त्यांच्यासाठी मोठं आव्हान आहे. तिथल्या लोकांनी तालिबान्यांना पळताभुई थोडी केली आहे. नॉर्दर्न अलायन्सने जवळपास 350 तालिबान्यांना मारल्याचा दावा केला आहे. तर 40 तालिबानी कैद केल्याचंही सांगण्यात आलं आहे. या सगळ्यामुळे तालिबानी भयंकर संतापले असून त्यांना याचा बदला घ्यायचा आहे. वारंवार तालिबानी पंचशीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे.

या सगळ्या प्रकारा दरम्यान त्यांच्याकडून अमेरिकी वाहन, हत्यारं आणि स्फोटकांचा मोठा साठा तालिबान्यांकडून मिळाला आहे. या घटनेमुळे तालिबानला मोठा धक्का बसला आहे. तर याचा बदला घेतला जाईल असं तालिबान्यांनी म्हटलं आहे.

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी अमेरिकन सैन्याने अफगाणमधून माघार घेतल्यानंतर आनंद उत्सव साजरा केला. अमेरिकेचं सैन्य जाताच आज देश पूर्णपणे स्वतंत्र झाला असंही जबीउल्लाह मुजाहिद यांनी म्हटलं आहे. जेव्हा काबुल विमानतळ तालिबान्यांनी पूर्णपणे काबीज केले तेव्हा तालिबानी दहशतवाद्यांनी एक भितीदायक उत्सव साजरा केला.

तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आकाशात अनेक रॉकेट डागले. तालिबानच्या या गोळीबाराने काबूलचे स्थानिक लोक भयभीत झाले होते. तालिबानने त्यांना सांगितले की हा हल्ला नाही, पण अमेरिकेचं सैन्य अफगाण सोडून गेल्यानंतर उत्सव साजरा केला जात होता.