Afghanistan crisis: Kabul एअरपोर्टवर Italy च्या विमानावर फायरिंग

काबुलवर तालिबानचा ताबा, पण काबुल एअरपोर्ट अजूनही अमेरिकन सैन्याच्या हातात

Updated: Aug 26, 2021, 07:36 PM IST
Afghanistan crisis: Kabul एअरपोर्टवर Italy च्या विमानावर फायरिंग title=

Kabul : गेल्या 10 दिवसात अफगाणिस्तानमधील परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तान (afganistan) ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने काबूलवर आपली पकड घट्ट केली आहे. आता अफगाणिस्तानवर पूर्णपणे तालिबानचे राज्य आहे आणि आता तालिबान (Taliban) अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. या सर्वांच्या दरम्यान, लोक काबूल विमानतळावरून देश सोडत आहेत. 

अनेक देश सध्या अफगाणिस्तानातून आपल्या लोकांना बाहेर काढण्यात गुंतले आहेत. अफगाणिस्तानातून बाहेर पडणारा एकमेव दरवाजा काबूल विमानतळ आहे, जो अमेरिकन सैन्याने आपल्या ताब्यात घेतला आहे. दरम्यान, आज संध्याकाळी बातमी आली की काबुलमध्ये इटालियन विमानावर गोळीबार करण्यात आला.

ताज्या अहवालांनुसार, इटालियन विमान काबूल विमानतळावर टेकऑफ करताना त्यावर फायरिंग करण्यात आली. कोणी गोळीबार केला हे स्पष्ट नाही पण कोणीही जखमी झाले नाही. अनेक देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढत आहेत आणि काबूल विमानतळ हा देशातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे.