Apple Watch मुळे महिलेला मिळाली गोड बातमी; चाचणी करताच धक्कादायक सत्य समोर

Apple Watch घालताच महिलेला कळालं ती प्रेग्नेंट आहे, अनेक चाचण्या केल्यानंतर समोर आलं सत्य....  

Updated: Oct 11, 2022, 09:09 AM IST
Apple Watch मुळे महिलेला मिळाली गोड बातमी; चाचणी करताच धक्कादायक सत्य समोर title=

Apple Smartwatch Unique Features: वेग-वेगळे फिचर्स असल्यामुळे  Apple स्मार्टवॉच जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्ही ऐकलं असेल की, Apple स्मार्टवॉचमुळे अनेकांचे प्राण वाचले. (Apple Wrist Watch versions) ऍपलच्या स्मार्टवॉचमध्ये ऑक्सिजन व्हॉल्व्ह, हार्टबीट्स आणि इतर चाचण्यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. पण तुम्ही कधी ऐकले आहे की, ऍपल स्मार्टवॉचने गर्भधारणेबद्दल सांगितले आहे. तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल, पण हे खरे आहे. 

एका महिलेचा दावा आहे की ऍपल वॉचने तिच्या गर्भधारणेबद्दल सांगितलं आहे. या संदर्भात महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. सध्या महिलेची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Navigate around with the help of Apple Maps)

महिलेने सांगितले की तिच्या हृदयाची गती सुमारे 57 होती. ती अचानक 72 पर्यंत वाढली. असं जवळपास 15 दिवस सुरु होतं. यामागचं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा महिलेने प्रचंड प्रयत्न केले, पण यश मिळाले नाही.  (Tell time accurately)

महिलेने सांगितले की तिची जीवनशैली निरोगी आहे आणि ती नियमितपणे जिममध्ये जात होती, परंतु हृदयाच्या ठोक्यांच्या आकड्यांमधील फरक तिला त्रास देत होता. (Notifications & alerts) शेवटी, कारण जाणून घेण्यासाठी त्याची कोरोना चाचणी देखील केली, पण महिलेचा कोरोना रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला.

एवढंच नाही तर महिलेने ताप आणि इतर अनेक आजारांसाठी अनेक तपासण्या केल्या, पण त्यात काहीही आढळले नाही. त्यानंतर महिलेने गर्भधारणा चाचणी करण्याचा निर्णय घेतला. महिलेने सांगितलं, मी वाचलं होतं की कधीकधी अशी लक्षणे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात दिसून येतात. दुसऱ्या दिवशी महिलेचा प्रेग्नेंसी रिपोर्ट आला, ज्यामध्ये ती गर्भवती असल्याचं कळालं. ( iphone Remote Control Functions)

कोणतीही पारंपारिक लक्षणं दिसली नाहीत
यानंतर ती एका डॉक्टरकडेही गेली ज्यांनी ती खरोखरच गरोदर असल्याचं सांगितलं. परंतु तिला कोणतीही पारंपारिक लक्षणे दिसून आली नाहीत. अशा परिस्थितीत हृदयाच्या ठोक्यांमधील फरक समजून घेण्याचं श्रेय महिलेनं ऍपल वॉचला दिलं. सोशल मीडियावर पोस्ट करत महिलेने इतर लोकांना हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं.

ऍपल वॉचमध्ये हार्टबीट अलर्ट कसे नियंत्रित करावे
- सर्व प्रथम iPhone वर हेल्थ ऍप ओपन करा.
- त्यानंतर 'ब्राउज' टॅब निवडा.
- सायकल ट्रॅकिंग निवडा.
- 'विकल्प' टॅप करा.
- आता हार्टबीट्स चालू किंवा बंद करा.