Bride and Groom Dance : स्टेजवर घडला भयानक प्रकार, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडीओचा धुमाकूळ 

Updated: Sep 28, 2021, 10:10 AM IST
Bride and Groom Dance : स्टेजवर घडला भयानक प्रकार, VIDEO व्हायरल  title=

मुंबई : प्रत्येक नववधु- नवरदेवाला आपलं लग्न अगदी यादगार बनवायचं असतं. हा दिवस त्यांच्यासोबत इतरांच्याही लक्षात राहील असा त्यांना हवा असतो. त्यासाठी ते खास प्रयत्न करतात. मग ती ग्रँड एंट्री असो वा स्टेजवरील डान्स. मात्र या कपलने काही असं केलं की ज्याच्यामुळे त्यांच्या लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एक जोडपं लग्नाच्या ठिकाणी आनंदाने नाचताना दिसत आहे. पण नाचता नाचता पुढे असं काही घडलं ज्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. Instagram वर @surprizhikayeler या अकाउंट द्वारे  व्हिडिओ शेअर करण्यात आला. एक जोडपं लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करताना हातात हात घालून नाचताना दिसतात. मात्र पुढे नाचता नाचता ते खाली पडल्याचं दिसत आहे. 

नाचता नाचता हे दोघे इतके जोरात पडतात. पण तरीही देखील त्यांचा नाचण्याचा उत्साह कमी झालेला नाही. या दोघांनी पुन्हा एकदा आपला क्षण आनंदाने जगण्याचा निर्णय घेतला.हा व्हिडीओ सोशल मी़डियावर 25 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 56 हजाराहून अधिक लोकांनी याला लाइक्स केलं आहे.