Turkey Earthquake : कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? तुर्की भूकंपानंतर व्हायरल होतोय 'हा' फोटो...

Turkey-Syria Earthquake: तुर्कीमध्ये आलेल्या भीषण भूकंपाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. यातल्या एका फोटोनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.   

Updated: Feb 7, 2023, 12:49 PM IST
Turkey Earthquake : कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? तुर्की भूकंपानंतर व्हायरल होतोय 'हा' फोटो... title=
fact check Old Picture a Dog goes viral after turkey Earthquake know details latest Marati news

Turkey-Syria Earthquake: सोमवारी तुर्कीचा काही भाग आणि सीरियामध्ये 7.8 ते 7.9 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला आणि एका क्षणात सारंकाही उध्वस्त झालं. मोठाल्या इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणं कोसळल्या आणि अनेक स्वप्न बेचिराख झाली. कुणाचं हक्काचं, कुणाचं प्रेमाचं माणूस इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलं. काहीजणांनी या ढिगाऱ्याखालीच अखेरचा श्वासही घेतला. जगण्याची काहीच शाश्वती नसते हेच पुन्हा एकदा या नैसर्गिक आपत्तीमुळं सिद्ध झालं. (fact check Old Picture a Dog goes viral after turkey Earthquake know details latest Marati news )

सुरुवातीला 30, 60, 500 आणि आता थेट 4000 इतके बळी या भूकंपानं घेतल्याची अधिकृत माहिती नुकतीच समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून मात्र भलतीच भीती व्यक्त करत हा आकडा 10 हजारांच्याही वर जाऊ शकतो असं म्हटलं आहे. त्यामुळं आता जगभरातून तुर्की आणि सीरियासाठी अनेकांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. हे भयाण वास्तव पाहता हा दशकातील सर्वात मोठा भूकंप (Earthquake) असल्याचं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. 

व्हायरल होतोय एका श्वानाचा बोलका फोटो 

तिथे तुर्कीमध्ये (turkey death toll) मृत्यूचं तांडव सुरु असून, शहरंच्या शहरं उध्वस्त होत असतानाच अनेक निष्पापांचा बळी गेल्याचं चित्र काळीज पिळवटून टाकत आहे. अनेक फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून तुर्की आणि सीरियातील गंभीर परिस्थिती जगापुढे आली आहे. यातच एक असा फोटो व्हायरल होत आहे, जो मोठ्या प्रमाणावर अनेकांनी रिशेअरही केला आहे. 

हेसुद्धा वाचा : Turkey Earthquake Live News : तुर्कीमध्ये मृत्यूचं तांडव; पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपानं देश हादरला

'आजच्या दिवसातील काळीज तिळतिळ तोडणारा फोटो...', अशा कॅप्शनसह पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये एका ढिगाऱ्यापाशी श्वान बसलेला दिसत आहे. एका मृत व्यक्तीपाशी तो बसला असून, मोठ्या आशेनं तो कुणाकडेतरी पाहत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर हा श्वान तुर्कीच्या भूकंपातून बचावल्याचं वृत्तही काहींनी प्रसिद्ध केलं आहे. पण, मुळात तसं नाहीये. 

fact check Old Picture a Dog goes viral after turkey Earthquake know details latest Marati news

काय आहे या फोटोमागचं सत्य? 

उपलब्ध असणाऱ्या अधिकृत माहितीनुसार हा फोटो Czech Republic मधील असल्याचं सांगण्यात येत आहे. 4 जानेवारी 2019 ला हा फोटो पहिल्यांदाच पोस्ट करण्यात आला होता. त्यामुळं तुर्कीच्या भूकंपाशी या फोटोचा काहीही संबंध नाही हे स्पष्ट होत आहे. असं असलं तरीही हा फोटो प्रचंड बोलका आहे हे मात्र नाकारता येणार नाही.