Turkey Earthquake Live News : तुर्कीमध्ये मृतांचा आकडा 10 हजारांवर जाण्याची शक्यता

Turkey Earthquake Live News : तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळं संकटं आणखी वाढत असल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. त्यातच पुन्हा एकदा इथं भूकंपाचा हादरा बसला आहे.   

Turkey Earthquake Live News : तुर्कीमध्ये मृतांचा आकडा 10 हजारांवर जाण्याची शक्यता

Turkey Earthquake Live News : सोमवारी आलेल्या भीषण भूकंपामुळं तुर्की आणि सीरियामध्ये परिस्थिती अतिशय भयावह वळणावर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. 7.8 रिश्टर स्केलच्या पहिल्या भूकंपानंतरही तुर्कीमध्ये जवळपास तीनहून अधिक भूकंपाचे धक्के बसले. यानंतर इथं थोड्याथोड्या अंतरावर सातत्यानं धरणीकंप जाणवल्याची माहितीसुद्धा स्थानिक वृत्तसंस्थानी दिली. अतिशय भयाण अशा भूकंपानंतर तुर्कीमध्ये मृतांचा आकडा 4000 च्याही वर पोहोचला. नैसर्गिक आपत्तीमुळं ओढावलेलं हे संकट पाहता सध्या तुर्कीला मदतीचा हात देण्यासाठी भारताकडूनही एनडीआरएफचं  (NDRF) पथक रवाना झालं आहे. 

 

7 Feb 2023, 14:45 वाजता

Turkey Earthquake Live News : तुर्कीमध्ये मृतांचा आकडा 5000 च्या पलीकडे. अद्यापही मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम सुरु. गंभीर जखमी आणि मृतांची संख्या वाढण्याची भीती 

7 Feb 2023, 14:13 वाजता

Turkey Earthquake Live News : भारतानं पुढे केलेला मदतीचा हात पाहून तुर्कीकडून मानण्यात आले आभार. 'दोस्त' म्हणत व्यक्त केली कृतज्ञता. 

7 Feb 2023, 13:15 वाजता

Turkey Earthquake Live News : तब्बल 22 तासानंतर ढिगाऱ्याखालून महिलेला जीवंत बाहेर काढण्यात बचावपथकांना यश. तुर्कीमध्ये मृतदेहांचा खच 

7 Feb 2023, 12:49 वाजता

Turkey Earthquake Live News : तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भीषण भूकंपामुळं प्रचंड हानी झाली आहे. दशकातील सर्वात मोठी आपत्ती म्हणून या भूकंपाकडे पाहिलं जात आहे. 

 

7 Feb 2023, 12:06 वाजता

Turkey Earthquake Live News : तुर्कीमध्ये भारतातून पाठवण्यात आलेलं NDRF चं पथक पोहोचलं. पाहा त्या क्षणाचा VIDEO 

हेसुद्धा वाचा : Turkey Earthquake : प्राण्यांना भावना नसतात? तुर्की भूकंपानंतर व्हायरल होतोय 'हा' फोटो, पण त्यामागचं सत्य माहितीये का? 

 

7 Feb 2023, 11:58 वाजता

Turkey Earthquake Live News : तुर्कीमध्ये 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. गेल्या 100 वर्षांमध्ये आली नाही, अशी आपत्ती तुर्कीवर धडकल्यामुळं या संकटाची जाणीव साऱ्या जगाला होत आहे. दरम्यान, या भीषण भूकंपामुळं सीरियातील अनेक ऐतिहासिक वारसा असणारी ठिकाणंही उध्वस्त झाल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रायाद्वारे देण्यात आली आहे. 

7 Feb 2023, 11:16 वाजता

Turkey Earthquake Live News : प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार तुर्कीमध्ये सध्या मृतांचा आकडा 4 हजार इतका आहे. पण, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नं दिलेल्या माहितीनुसार हा आकडा आणखी वाढू शकतो. मृतांची संख्या 8000 च्याही वर जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

7 Feb 2023, 11:15 वाजता

Turkey Earthquake Live News : मध्य तुर्कीत पुन्हा भूकंप. 5.6 रिश्टर स्केलच्या भूकंपानं हादरला देश.  रॉयटर्सने युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे. EMSC च्या रिपोर्ट्सनुसार, भूकंपाचा केंदबिंदू 2 किमी खोलीवर होता.