फ्लोरिडा शाळा दुर्घटना : भारतीय महिलेमुळे वाचले अनेक मुलांचे जीव

अमेरिकेत काही दिवसांपूर्वी माजी विद्यार्थ्याने फ्लोरिडा शाळेत गोळीबार केला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 18, 2018, 02:26 PM IST
फ्लोरिडा शाळा दुर्घटना : भारतीय महिलेमुळे वाचले अनेक मुलांचे जीव  title=

मुंबई : अमेरिकेत काही दिवसांपूर्वी माजी विद्यार्थ्याने फ्लोरिडा शाळेत गोळीबार केला. 

यामध्ये 17 लोकांनी आपला जीव गमावला. अचानक केलेल्या गोळीबारामुळे अनेक लोकं गोंधळले. मात्र शाळेत उपस्थित असलेल्या एका शिक्षिकेच्या प्रसंगावधानामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीव वाचलेत. या शिक्षिकेचं सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. 

शांती विश्वनाथन असं या शिक्षिकेचं नाव असून विद्यार्थी त्यांना मिसेज वी नावाने संबोधतात. या शिक्षिकेचे अनेक पालक आभार मानत असून त्यांचीच चर्चा आहे. 

शिक्षिकेने असे वाचवले जीव 

घटना घडली त्यावेळी शांती विश्वनाथन आपल्या वर्गात होत्या. दुसऱ्यांदा जेव्हा त्यांना फायर अलार्म वाजताना ऐकू आले तेव्हा त्यांना ही गोष्ट थोडी वेगळी वाटली. कारण अलार्म लगेच बंद झाला. तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना दाराआड लपण्यास सांगितले. तसेच वर्गाचा गेट देखील आतून बंद केला. आणि लगेच खिडक्यांना पेपर लावून बंद केले. 

SWAT टीमसाठी देखील खोलला नाही दरवाजा 

काही वेळानंतर SWAT टीम शाळेत पोहोचली. शाळेची तपासणी करताना SWAT टीम विश्वनाथन यांच्या वर्गात गेली. टीमने दरवाजा बऱ्याचदा ठोकल्यानंरही शिक्षिकेने दरवाजा खोलला नाही. त्यांना भिती वाटली की दरवाजाच्या त्या बाजूला कुणी आरोपी तर नाही. तेव्हा तिने SWAT टीम ला सांगितले की, दरवाजा पाडा किंवा चावीने उघडा पण शिक्षिकेने आतूर दरवाजा उघडला नाही.