ब्रिटनमधल्या श्रीमंतांच्या यादीत अव्वल क्रमांकावर 'हिंदूजा बंधू'

ब्रिटनमधल्या श्रीमंतांच्या यादीत मूळ भारतीय असलेल्या हिंदूजा बंधूंचा पहिला क्रमांक लागलाय.

Updated: May 13, 2019, 10:27 PM IST
ब्रिटनमधल्या श्रीमंतांच्या यादीत अव्वल क्रमांकावर 'हिंदूजा बंधू' title=

मुंबई : ब्रिटनमधल्या श्रीमंतांच्या यादीत मूळ भारतीय असलेल्या हिंदूजा बंधूंचा पहिला क्रमांक लागलाय. त्यांची संपत्ती २२ अब्ज पौंड इतकी आहे. त्याखालोखाल मुंबईचे रुबेन बंधू दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती १८.६६ अब्ज पौंड आहे. श्रीचंद आणि गोपीचंद हिंदूजा हे हिंदूजा समूहातील कंपन्यांचे मालक आहेत. त्यांची संपत्ती वर्षभरात १.३५ अब्ज पौंडांनी वाढलीय. संडे टाईम्स रिच लिस्टमध्ये हिंदूजांचं नाव २०१४ आणि २०१७ मध्ये पहिल्या क्रमांकावर होते. ते नंतर खाली गेलं असताना आता पुन्हा त्यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. 

तर मूळ भारतीय असलेले लक्ष्मी मित्तल यांना ३.९९ अब्ज पौंडाचा फटका बसला असून ते ११ व्या क्रमांकावर आहेत. तर गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेले जिम रॅटक्लिफ आता तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची मालमत्ता १८.१५ अब्ज पौंड एवढी आहे. या  यादीमध्ये एकूण 1000 व्यक्तींचा समावेश होतो. 

मागील वर्षी अव्वल स्थानावर विराजमान असलेले ब्रिटिश उद्योजक जिम रॅटक्लिफ यंदा तिसऱ्या क्रमांकावर आहेत.