पाकिस्तान निवडणूक: इम्रान खान यांचा पक्ष बहुमताच्या दिशेने...

पाकिस्तानात सत्ता बदल होणार

Updated: Jul 26, 2018, 12:49 PM IST
पाकिस्तान निवडणूक: इम्रान खान यांचा पक्ष बहुमताच्या दिशेने... title=

नवी दिल्ली : पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खानचा तेहरीक ए पाकिस्तान हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. नॅशनल असेंबलीच्या २७२ जागांपैकी ११२ जागांवर इम्रान खानाचा पक्ष आघाडीवर आहे. तर विद्यमान सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग नून हा नवाज शरीफ यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. नवाज शरीफ यांच्या पक्षाला 64 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारींच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला ४४ जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तानी जनतेनं २६/११चा सूत्रधार हाफीज सईदच्या राजकीय पक्षाला संपूर्ण पणे नाकारलं आहे. सईदच्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. तर ५० ठिकाणी इतर उमेदवार आघाडीवर आहेत.

पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्याप्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख शहाबाज शरीफ यांनी केला आहे. पाकिस्तानात बुधवारी मतदान घेण्यात आलं. त्यात शरीफ यांच्या पक्षाला आतापर्यंत ६४ जागांवर आघाडी मिळाली आहे. हा निकाल अमान्य असल्याचं शहाबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.